श्री भैरवनाथ विद्या मंदिर, पाबळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इवलेसे|श्री. भैरवनाथ विद्यामंदिर, पाबळ


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


माहिती[संपादन]

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात असलेल्या पाबळ या गावात श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळची स्थापना इ.स. १९५३ साली शिक्षण प्रसारक मंडळाने केली. विद्यालयामध्ये ५ वी ते १२ वी पर्यंतचे मराठी माध्यमातून, तसेच इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्लिश मधून शिक्षण दिले जाते.८ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांसाठी मूलभूत तंत्रज्ञानाची (I.B.T.) ओळख हा व्यवसायपूर्व अभ्यासक्रम चालवला जातो. ११-१२ वीसाठी कला, वाणिज्य, शास्त्र, शेती शास्त्र या शाखांसोबतच एम.सी.व्ही.सी. (Minimum Competency Vocational Courses) ही शाखा उपलब्ध आहे. पाबळ पंचक्रोशीतील प्रतिवर्षी जवळपास २००० ते २५०० विद्यार्थी या संस्थेतून शिक्षणाचा लाभ घेतात.

प्रशालेच्या भव्य इमारतीसह क्रीडांगण, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, इ. गोष्टी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी शाळा उपलब्ध करून देत असते. उदा. गटपातळी वरील क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन, रांगोळी स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन प्रशाला करते. विद्यार्थी एलिमेन्ट्री, इंटरमीजिएट या चित्रकलेच्या व स्काॅलरशिप स्पर्धा परीक्षांमध्येही भाग घेतात आणि यश मिळवतात. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी, खो-खो आणि लेझीम सामन्यांमध्ये नेहमीच क्रीडांगण गाजवले आहे.

गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षणाची देखील सुविधा उपलब्ध आहे, विद्यार्थी १२ वी नंतर श्री . पद्ममणी जैन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात पूर्ण करतात. महाविद्यालयाची भव्य इमारत आणि क्रीडांगण गावापासून एक किलोमीटरवर आहे.

शाळा आणि आय.बी.टी.[संपादन]

Introduction to Basic Technology (I.B.T.) विद्यालयामध्ये ५ वी ते १२ वी चे वर्ग इतर शाळांसारखे चालतातच. परंतु १९८७ पासून वैशिष्ट्य ठरलेले मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा विषय विद्यार्थ्यांना ८ वी ते १० वी मध्ये शिकवला जातो. हा कोर्स राबवणारी ही पहिली शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. 'काम करत शिकणे' या मान्यतेवर आधारित कोर्स डॉ. कलबाग, विज्ञान आश्रम चे संस्थापक यांनी तयार केला आणि देशभरातील अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. आता तर हा मुख्य विषयांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. हा कोर्स मुख्यतः ४ विभागांमध्ये विभागला आहे-

१) अभियांत्रिकी

२) ऊर्जा- पर्यावरण

३) शेती- पशुपालन

४) गृह-आरोग्य

आठवड्यातील एक संपूर्ण दिवस विद्यार्थी हे विषय शिकतात. पाबळ ने सोम- ८ वी, बुध- १० वी, शुक्र- ९ वी असे वेळापत्रक तयार केले आहे. Theory (२०%) & Practical (८०%) अशा प्रकारे अभ्यासक्रमाचे विभाजन करण्यात आले आहे. ८ आणि ९ वी मध्ये बेसिक गोष्टी प्रात्यक्षिकाद्वारे शिकून १० वी ला स्वतंत्र प्रकल्प घेतात. हे प्रकल्प समाजाची गरज, उपलब्ध साहित्य, आधुनिक तंत्रज्ञान, अवगत असलेले ज्ञान, इ. बाबींवरती अवलंबून असतात. शाळा आय.बी. टी. विषयांसाठी स्वतंत्र इमारत, साधने व साहित्य, निदेशक पुरवते. या विषयासाठी विज्ञान आश्रम ही संस्थाही शाळेस मार्गदर्शन करत आहे.

समाजोपयोगी सेवा[संपादन]

आय.बी.टी. चे विद्यार्थी शाळेची, गावाची गरज ओळखून ग्रामसेवा करतात. समाजास पुरवलेल्या या सेवांतून जे काही उत्पन्न मिळते ते विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी वापरले जाते. समाजोपयोगी सेवा पुरवत असताना विद्यार्थ्यांच्या व्यवहारी ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. उदा. शाळेचे बेंचेस दुरुस्त करणे, वर्ग खोलीस रंग लावणे, शेतकऱ्याच्या शेतात जाऊन मातीचा नमुना घेऊन परीक्षण करून देणे, रक्तगट तपासून देणे, खाद्यपदार्थ तयार करून विक्री करणे, इ.

प्रशासन[संपादन]

शिक्षक वृंद आणि सहकार

श्री. गोवर्धन राठोड, प्राचार्य.

श्री. कैलास धुमाळ, आय.बी.टी.समन्वयक.

श्री. सुरेश चौधरी, शेती निर्देशक.

सौ. सविता चौधरी, ऊर्जा-पर्यावरण निर्देशिका.

श्री. कैलास गावडे, अभियांत्रिकी निर्देशक.

सौ. शशिकला जाधव, गृह-आरोग्य निर्देशिका.

संपर्क[संपादन]

श्री. भैरवनाथ माध्य. आणि उच्च माध्य. विद्यामंदिर, पाबळ

मु.पो. पाबळ, ता. शिरूर,

जि. पुणे, पिन. नं. ४१२४०३

महाराष्ट्र, भारत

इ-मेल: principalsbvm@gmail.com

फोन नं: ०२१३८

http://sbvmpabal01.blogspot.com/