ओवळीये
?ओवळीये (Owaliye) महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सावंतवाडी |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | श्रीमती तारामती नाईक |
बोलीभाषा | मालवणी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 416510 • एमएच/07 |
ओवळीये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. आंबोली घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या पारपोली, देवसू, वेर्ले, सांगेली या गावांच्या मध्यभागी छोटंसं आणि जैवी विविधतेने नटलेले गाव आहे.
हे गाव मूळचे इथले नसून या गावातील लोक पूर्वी कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातून स्थानांतरित झाले आहेत.
या गावाचे ग्रामदैवत श्री देव गांगोबा आहे. या गावाची सुरुवात ही श्री देव गांगोबाचे मंदिराने होते. मंदिरानंतर जिल्हा परिषद सिंधुदुर्गची प्राथमिक शाळा आहे. ज्यामधे अंगणवाडी, पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरले जातात. नंतर गावातील घरांची सुरुवात होते.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]शेजारील गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/