एलिझाबेथ टेलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एलिझाबेथ टेलर

एलिझाबेथ टेलर (इंग्लिश: Elizabeth Taylor ;) (फेब्रुवारी २७, इ.स. १९३२; लंडन, इंग्लंड - मार्च २३, इ.स. २०११; लॉस एंजिलिस, अमेरिका) ही इंग्लिश भाषेतील चित्रपटांत काम करणारी इंग्लंडात जन्मलेली अमेरिकन अभिनेत्री होती. मेट्रो-गोल्डविन-मेयर कंपनीच्या चित्रपटांतून बालकलाकार म्हणून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केलेली टेलर हॉलिवुडाच्या सुवर्णकाळातली अतिशय यशस्वी अभिनेत्री ठरली. कारकिर्दीत अनेक पुरस्कार व मानसन्मान कमवलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण असे निळे डोळे असलेली टेलर अप्रतिम लावण्य, उच्च राहणीमानामुळे प्रकाशझोतात राहिली.

एलिझाबेथ टेलरने 'जायंट', 'कॅट आॅन अ हाॅट टिन रूफ', 'क्लिओपात्रा', 'नॅशनल वेलवेट' यासारख्या गाजलेल्या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. 'बटरफिल्ड ८' आणि 'हू इज अफ्रेड आॅफ व्हर्जिनीया वूल्फ' या चित्रपटातील अभिनयासाठी तिला आॅस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

बाह्य दुवे[संपादन]