Jump to content

इलेव्हनिल वलारीवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एलाव्हेनिल व्हालारिवान या पानावरून पुनर्निर्देशित)
इलेव्हनिल वलारीवन
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव इलेव्हनिल वलारीवन
पूर्ण नाव इलेव्हनिल वलारीवन
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान गुजरात, भारत
जन्मदिनांक २ ऑगस्ट, १९९९ (1999-08-02) (वय: २५)
जन्मस्थान कुडलूर, तामिळनाडू, भारत
उंची १६४ सेमी
वजन ५४ किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार १० मी एर रायफल
प्रशिक्षक गगन नारंग, नेहा चौहान
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०२१ उन्हाळी


इलेव्हनिल वलारीवन(२ ऑगस्ट, १९९९:कुडलूर, तमिळनाडू []) ही भारतीय महिला नेमबाज आहे. २०२१ च्या आकडेवारीनुसार ती १० मीटर एर रायफल शूटिंग प्रकारात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.[][] अनेकवेळा जागतिक जेतेपद प्राप्त करणारी वलारीवन २०२१ मध्ये तोक्यो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी

[संपादन]

इलेव्हनिल आपल्या पालकांसोबत गुजरातमधील अहमदाबाद येथे स्थायिक झाली[] व तेथेच तिचे बालपण गेले. तिच्या आईने वनस्पतीशास्त्रात पीएच.डी. तर वडिलांनी रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. वलारीवनला बालपणापासूनच अ‍ॅथलेटीक्समधील ट्रॅक एव्हेंटमध्ये अधिक रस होता परंतु वडिलांनी तिला नेमबाजीमध्ये प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.


प्रशिक्षण

[संपादन]

माजी भारतीय नेमबाज गगन नारंग यांनी वलारीवनची नेमबाजीमधील जिद्द पाहिली आणि तिला शिकवण्यास सुरुवात केली. वयाच्या पंधराव्या वर्षी गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाऊंडेशनच्या सहकार्याने तिला जिल्हास्तरीय क्रीडा शाळेत (डीएलएसएस) व्यावसायिक प्रशिक्षण मिळाले. नेहा चौहान यांच्याकडून तिला प्राथमिक प्रशिक्षण मिळाले.

वलारीवनच्या आई-वडिलांनी तिच्या खेळावरील प्रेमाला पाठिंबा दिला तसेच अभ्यास करण्यासाठी तिच्यावर कधीही दबाव आणला नाही. सुरुवातीला तिला मॅन्युअल शूटिंग श्रेणीवर सराव करावा लागला. त्यात तिची दररोज प्रगती होऊ लागली.त्यानंतर तिला गुजरात क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) कडून पाठिंबा मिळू लागला.

व्यावसायिक यश

[संपादन]

वलारीवनने अखिल भारतीय शालेयस्तरीय स्पर्धांमध्ये शूटिंग खेळात प्रभाव पाडण्यास सुरुवात केली आणि २०१७ मध्ये तिने भारतीय राष्ट्रीय क्रीडा नेमबाजी पथकात प्रवेश केला. यामुळे तिला तिचा खेळ सुधारण्यासाठी अधिक सुविधा आणि सहकार्य मिळाले.२०१८ मध्ये सिडनी येथे झालेल्या जुनियर वर्ल्ड कपमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले.[] हे तिचे पहिले मोठे आंतरराष्ट्रीय यश होते. अंतिम सामन्याच्या फक्त एक दिवस आधी ती तिथे पोहोचली. तेथे तिला दुखापत झाली होती आणि तिचे पाय सुजले होते. परंतु तिने केवळ चॅम्पियनशिप जिंकली नाही तर तिच्या गटात एक नवीन जुनियर विश्व विक्रमदेखील स्थापित केला. २०१९ मध्ये तिने रिओ डी जानेरोमधील आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.[] नंतर, त्याच वर्षी चीनमधील पुटियान येथे झालेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले आणि तिच्या गटात जगातील पहिल्या क्रमांकाचे मानांकन तिला प्राप्त झाले.[]

२०२० मध्ये, तिने बांगलादेश नेमबाजी फेडरेशनतर्फे आयोजित शेख रसेल एर रायफल चॅम्पियनशिप या ऑनलाईन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.[]

पुरस्कार

[संपादन]

२०२० मध्ये भारतीय उद्योग संस्था एफआयसीसीआयने वलारीवनला तिच्या कामगिरीबद्दल स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरवले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Subrahmanyam, V. v (2020-11-07). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). Hyderabad. ISSN 0971-751X.
  2. ^ DelhiApril 8, Asian News International New; April 8, 2020UPDATED:; Ist, 2020 13:15. "Target is still the same, process has changed: Elavenil Valarivan on Tokyo Games postponement". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-02-22 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ a b c d "ISSF - International Shooting Sport Federation - issf-sports.org". www.issf-sports.org. 2021-02-22 रोजी पाहिले.
  4. ^ Srinivasan, Kamesh (2020-10-18). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). New Delhi. ISSN 0971-751X.
  5. ^ "Wrestler Bajrang Punia, shooter Elavenil Valarivan honoured at FICCI India Sports Awards 2020 - Sports News , Firstpost". Firstpost. 2020-12-09. 2021-02-22 रोजी पाहिले.