Jump to content

एकविरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एकवीरा देवी, कार्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
एकवीरा आई मंदिर

नाव: एकविरा
देवता: एकवीरा आई
स्थान: महाराष्ट्र
स्थान: कार्ले लेणी
निर्देशांक: 18°47′00″N 73°28′14″E / 18.78333°N 73.47056°E / 18.78333; 73.47056


एकवीरा आई ही एक हिंदू देवता आहे.[] भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते.

एकवीरा आईचे देऊळ

[संपादन]

एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे.[] प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडून विशेषतः सीकेपी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते. तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे कुलदैवत आहे. या मंदिर-संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहेत, असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते. या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपुर आहेत आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. बकरी/ कोंबडी यांसह इतरही काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत, अशी भाविकांची मान्यता आहे.[]

दंतकथा

[संपादन]

पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वरही तिने पांडवांना दिला.[ संदर्भ हवा ] एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.

तथापि, कार्बन डेटिंगनुसार असे आढळते की, या मंदिराची बांधणी दोन कालखंडांमध्ये झाली आहे - इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत आणि ५व्या शतकापासून ते १०व्या शतकापर्यंत.[ संदर्भ हवा ]

स्थान

[संपादन]

सदर मंदिर डोंगरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. एकवीरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्त्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. मुख्य देवता एकवीरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहेत. टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे.

एकवीरा आई मंदिर आणि कार्ले लेणी

कसे याल

[संपादन]

लोणावळ्यापासून ८ किमी. अंतरावर आहे. लोणावळ्यापासून ते एकवीरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर करता येतो. तसेच, ऑटो रिक्षादेखील उपलब्ध आहेत सेंट्रल पॉईंट लोणावळा (शिवनेरी बस स्टॉप) पासून ५ किमी. पुणे शहर (महाराष्ट्र) पासून ४९ कि.मी. मुंबईपासून ९७ कि.मी आहे.. पुणे लोणावळा मार्गावीर लोणावळ्याच्या अलीकडील मळवली रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे. पुणे ते लोणावळा अशी लोकल रेल्वेची सेवा आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Devale, Shambhurav Ramchandra (1963). Āpale deva, āpalī daivate. Śrī Lekhana Vācana Bhāṇḍāra.
  2. ^ GURAV, Dr MAHADEV D. “A GEOGRAPHICAL STUDY OF FAIRS AND FESTIVALS IN PUNE DISTRICT” (इंग्रजी भाषेत). Lulu.com. ISBN 9781387136025. C1 control character in |title= at position 1 (सहाय्य)
  3. ^ सुबोध कपूर (1 जुलै 2002). द इंडियन एन्सायक्लोपीडिया. कॉस्मो पब्लिकेशन्स. p. 2042. ISBN 978-81-7755-257-7. 23 एप्रिल 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]