ऋ
Jump to navigation
Jump to search
ऋ हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. ऋ हा 'ऱ्हस्व स्वर' आहे.
ऋ साचा:ध्वनिचित्र हवे हे मराठी भाषेच्या मुळाक्षरांत क्रमाने ९वे येणारे स्वरोच्चार वर्ण चिन्ह आहे. हा ऱ्हस्व स्वरोच्चार आहे. हा स्वरोच्चार रि आणि रु यांच्यामधला असून रु या व्यंजनोच्चारापेक्षा वेगळा आहे. हिंदी भाषक ऋचा उच्चार रि-सदृश करतात तर मराठी भाषक रु-सदृश.’र’ हा अर्धस्वर मानला गेलेला असल्याने ऋच्या या उच्चारणाचे वर्गीकरण स्वरोच्चारात होते.
इंग्रजीतसुद्धा y, r, l, w, h ही मुळाक्षरे अर्धस्वर मानली गेली आहेत. त्यांचे व्यंजनी उच्चार य, र, ल, व, ह असे असले तरी, key, arm, calm, hawk आणि Allah या शब्दांत या अक्षरांचा उच्चार स्वरसदृश होतो.