मिलिंद चंपानेरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिलिंद चंपानेरकर हे एक मुक्त पत्रकार असून मराठी लेखक आहेत.

चंपानेरकर यांनी १९९१ ते २००० या काळात इंडियन एक्सप्रेससाठी पत्रकारिता केली. त्यानंतर मात्र त्यांनी मुक्त पत्रकारिता पत्करली. त्यातून त्यांनी लिहिलेले रिपोर्ताज पद्धतीचे लेख व अनुभव, शाश्वत विकासासाठी या नियतकालिकामधून, तसेच दैनिक महाराष्ट्र टाइम्समधून प्रकाशित झाले आहेत. नक्षलग्रस्त भागांमधलं जनजीवन, आशियातील अल्पसंख्याकांच्या समस्या आणि राजकीय चळवळींचा मागोवा हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत. बस्तरकाश्मीर सारख्या अस्वस्थ प्रदेशांमध्ये फिरून तेथील सर्वसामान्य माणसांचे जीवनावर त्यांनी लेखन केलेले आहे. पॅलेस्टाईन प्रश्नासंबंधीच्या आशियाई देशांच्या शांतियात्रेत (२०१२) त्यांचा सहभाग होता.

पाकिस्तान-भारत पीपल्स फोरम फॉर पीस ॲन्ड डेमॉक्रसी या संस्थेच्या पुणे शाखेचे ते अध्यक्ष आहेत.

पुस्तके[संपादन]

  • असा घडला भारत ( १९४७ - २०१२) (संपादित, सहसंपादक - सुहास कुलकर्णी
  • ए.आर. रहमान (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - कामिनी मथाई)
  • गुड मुस्लिम बॅड मुस्लिम (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - महमू्द ममदानी, सह‍अनुवादक पुष्पा भावे)
  • टिंबक टूची ऐशीतैशी (बालसाहित्य)
  • त्या दहा वर्षांतील गुरू दत्त (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सत्या सरन)
  • यांनी घडवलं सहस्रक (संपादित, सहसंपादक - सुहास कुलकर्णी
  • लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घ पत्र (अनुवादित, मूळ इंग्रजी, ‘अम्मी : लेटर टु ए डेमॉक्रेटिक मदर’ लेखक - सईद मिर्झा)
  • वहिदा रेहमान : हितगुजातून उलगडलेली (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - नसरीन मुन्‍नी कबीर)
  • सुन मेरे बंधु रे : एस.डी. बर्मन यांचे जीवन-संगीत. (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सत्या सरन)

पुरस्कार[संपादन]

  • मिलिंद चंपानेरकर यांच्या ‘लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’ला अनुवादित पुस्तकासाठीचा महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.
  • लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकास २०१६चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.