इक्बाल (हिंदी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इक्बाल
दिग्दर्शन नागेश कुकुनूर
निर्मिती सुभाष घई
प्रमुख कलाकार श्रेयस तळपदे
नसरुद्दीन शहा
गिरिश कर्नाड
यतिन कार्येकर
कपिलदेव पाहुण्या भूमिकेत
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}इक्बाल हा इ.स. २००५ सालातील निर्मित व नागेश कुकुनूर दिग्दर्शित हिंदी भाषक चित्रपट आहे. इक्बाल नावाच्या एका मुक्या तरुण मुलाची क्रिकेट खेळातील गोलंदाज होण्याची तीव्र इच्छा त्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करवून क्रिकेट खेळाडू बनवते हे व यशस्वी होउन तो भारतीय क्रिकेट संघात त्याचा समावेश होतो. असे या चित्रपटात दाखवले आहे.

कथानक[संपादन]


इक्बाल हा भारतातील अतिशय लहान खेड्यात वाढलेला मुलगा असतो. व जन्मतःच मुका असतो. त्याचे लहानपणापासूनचे क्रिकेटवेड हे त्याच्या आईकडून मिळवलेले असते. आई क्रिकेटवेडी असली तरी त्याचे वडील अन्वर क्रिकेटचे पक्के द्वेष्टे असतात व क्रिकेट हा उपयोगशून्य लोकांच्या मनोरंजनाचा खेळ आहे व क्रिकेटच्या वेड भारताच्या अधोगतीचे कारण आहे असे त्यांचे म्हणणे असते. क्रिकेटऍवजी इक्बालने आपल्या घरगुती शेतीच्या धंद्यावर लक्ष द्यावे असे त्यांना वाटत असते.

इक्बाल लहानपणापासून आपल्या ग्रुरांना फिरायला घेउन गेल्यानंतर शेतामध्ये गोलंदाजीचा सराव करत असतो. त्याची बहिण त्याला या कामी बरीच मदत करत असते. बहिणीच्या मदतीने त्याला गावाजवळच्या क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळतो. अकादमीचे संचालक ज्यांना गुरुजी म्हणत असतात ते माजी भारतीय क्रिकेट कर्णधार असतात. अकादमीत इक्बाल मुका असल्याने त्याला बरेच जण चिडवत. त्याचा राग येऊन इक्बाल सरावाच्या वेळेस कमालला जखमी करतो. कमालच्या वडिलांचे अकादमीवर मोठे आर्थिक प्रभुत्व असते. त्यामुळे गुरुजी इक्बालला अकादमीमधून काढून टाकतात. इक्बालचा रणजी क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याच्या आशा संपुष्टात येतात.

एक दिवशी इक्बालला कळते की तो जो रोज मोहित नावाच्या एका दारुड्या व्यक्तीला रोज पहातो. तो एक माजी महान क्रिकेट खेळाडू होता परंतु काळाच्या पडद्या आड गेलेला असतो. इक्बाल मोहितला प्रशिक्षण देण्याची विनंती करतो. परंतु मोहित दारूच्या नशेबाहेर येउन त्याला प्रशिक्षण देण्यास नकार देतो. परंतु इक्बाल आपले प्रयत्न चालू ठेवतो व त्यात त्याला यश मिळते. इक्बालला मोहित चांगले प्रशिक्षण देतो व आंध्रप्रदेशच्या रणजी क्रिकेट संघामध्ये स्थान मिळवून देतो. इक्बालचे वडील काही काळापुरते इक्बालला क्रिकेटपासून दुर ठेवण्यात यश मिळवतात परंतु क्रिकेटची ओढ विरोधापुढे तोकडी पडते. इक्बाल रणजी संघात कमी दर्जाच्या आंध्रप्रदेशच्या संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मोठे यश मिळवून देतो. वृत्तपत्रांना त्याच्या कामगिरीची दखल घ्यावी लागते.

अंतिम सामन्यात आंध्रप्रदेशाची गाठ कमालच्या संघाशी पडते. अंतिम निर्णायक वेळेस गुरुजी इक्बालला घराच्या परिस्थितीची आठवण करून देतात व सामना हरल्यास त्याला आर्थिक आमिष देतात. त्यामुळे इक्बालचा शेवटच्या सत्रात खेळ खालावतो व त्यांचा संघ हरण्याचा परिस्थितीत येतो. इक्बाल याच वेळेस एंजट तर्फे गुरुजींनी दिलेल्या आमिषापेक्षा मोठ्या रकमेचे प्रायोजक मिळवतो व पुन्हा पुर्वीच्या जोषात गोलंदाजी करून कमालच्या संघास परास्त करतो. इक्बालच्या कामगिरी कपिलदेव पहातात व इक्बालचे राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यात शिफारस करतात. सरते शेवटी इक्बालचे भारतीय क्रिकेट संघात प्रवेश होतो. व त्याचे त्याच्या आईचे व बहिणीचे स्वप्न साकार होते. त्याचे वडिलही आता क्रिकेट भोक्ते होतात.

कलाकार[संपादन]

पुरस्कार व इतर[संपादन]

या चित्रपटासाठी श्रेयस तळपदे याला झी सिनेक्रिटीक्स पुरस्कारांत सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मिळाला. तसेच या चित्रपटाचे अतिशय सुरेख - हलका नाविन्यपूर्ण म्हणून सर्वांनी स्वागत केले.

बाह्य दुवे[संपादन]