Jump to content

इंदूर–नागपूर वंदे भारत एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंदूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)
इंदूर - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस
माहिती
प्रथम धाव २७ जून, २०२३
मार्ग
सुरुवात इंदूर
थांबे
शेवट नागपूर
अप क्रमांक २०९११
डाउन क्रमांक २०९१२
अंतर ६३५किमी (३९५मैल)
प्रवासीसेवा
खानपान ऑन-बोर्ड केटरिंग
तांत्रिक माहिती
गेज ब्रॉडगेज
वेग १३० किमी/तास

२०९११/२०९१२ इंदूर - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील २३वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे जी मध्य प्रदेशातील इंदूर शहराला महाराष्ट्रातील नागपूर शहराशी जोडते.[] या ट्रेनला पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून २०२३ रोजी हिरवा झेंडा दाखवला तेव्हा या गाडीची सेवा इंदूर जंक्शन ते भोपाळ जंक्शनपर्यंत होती.[] ९ ९ऑक्‍टोबर २०२३ पासून या सेवेचा नागपूरपर्यंत विस्तार करण्यात आली. [१]

आढावा

[संपादन]

ही ट्रेन भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाते, जी इंदूर जंक्शन, उज्जैन जंक्शन, भोपाळ जंक्शन, इटारसी जंक्शन आणि नागपूर जंक्शनला जोडते. ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस चालते.[] सुरुवातीला ही सेवा इंदूर जंक्शन ते भोपाळ जंक्शनपर्यंत असून[] ९ ऑक्‍टोबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या ट्रेनचा नागपूरपर्यंत विस्तार करण्यात आला, ज्यामुळे या प्रदेशात वर्धित कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली. [२]

रेक्स

[संपादन]

मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत पेरांबूर, चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्याद्वारे संकल्पित आणि निर्मित केलेली ही नववी मिनी वंदे भारत २.० एक्सप्रेस ट्रेन आहे. []

गाडीची रचना

[संपादन]

२०९११/२०९१२ इंदूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ७ वातानुकुलीत खुर्ची यान (एसी चेअर कार) आणि १ कार्यकारी खुर्ची यान (एक्झिक्युटिव्ह चेअर कार) डब्बे आहेत. ॲक्वा रंगातील वातानुकुलीत खुर्ची यान दर्शवतात आणि गुलाबी रंगातील डबे कार्यकारी खुर्ची यान दर्शवतात.

2 3 4 6 8
20911 </img> | C7 C6 C5 C4 C3 E1 C2 C1 |</img>
2 3 4 6 8
20912 </img> | C1 C2 E1 C3 C4 C5 C6 C7 |</img>

सेवा

[संपादन]
  • २०९११/२०९१२ इंदूर - भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून ६ दिवस आहे. ही गाडी २४८.४१ किमी (२५४.३५ मैल) अंतर सुमारे ३ तासांत ८४ किमी/तास गतीने धावते.
  • २०९११/२०९१२ इंदूर - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून ६ दिवस असेल. ही गाडी ७६ किमी/तास वैगाने ६३४ किमी (३९४.१४ मैल) अंतर ८ तास आणि २० मिनिटांत धावेल.

वेळापत्रक

[संपादन]

या २०९११/२०९१२ इंदूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे:-

INDB - NGP - INDB वंदे भारत एक्सप्रेस
२०९११ स्थानके २०९१२
आगमन प्रस्थान आगमन प्रस्थान
---- ०६:१० इंदूर जंक्शन २३:४५ ----
०६:५० ०६:५५ उज्जैन जंक्शन २२:४० २२:४५
०९:१० ०९:१५ भोपाळ जंक्शन २०:३० २०:३५
१०:३५ १०:४० इटारसी जंक्शन १८:५० १८:५५
११:५८ १२:०० बैतुल १७:२३ १७:२५
१४:३० --- नागपूर जंक्शन --- १५:२०

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "पहली बार एक साथ 5 वंदे भारत ट्रेनों का होगा उद्घाटन". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2023-06-14. 2023-06-18 रोजी पाहिले.
  2. ^ a b "PM Modi Launches Bhopal-Indore, Bhopal-Jabalpur Vande Bharat Express Trains". Zee News (इंग्रजी भाषेत). 2023-06-27 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. ^ "Indore: समय नहीं बदला तो इंदौर सेे नहीं मिलेंगे इंदौर-भोपाल वंदे भारत ट्रेन को ज्यादा यात्री". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2023-06-18 रोजी पाहिले.
  4. ^ "Train 18, India's Fastest, Named "Vande Bharat Express": Piyush Goyal". NDTV.com. 2023-04-19 रोजी पाहिले.