अभिमन्यू सिंग (जन्म २० सप्टेंबर १९७४) हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम करतो.
राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित अक्स (२००१) चित्रपटात सिंगने पहिले काम केले. २००९ मधील गुलाल (दिग्दर्शक अनुराग कश्यप) मध्ये त्याने मुख्य भिमिका साकारली ज्यासाथी त्याला स्टारडस्ट पुरस्कार मिळाला.[१]
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित २०१० च्या गँगस्टर चित्रपट रक्त चरित्र मधील त्याच्या अभिनयाने त्याला समीक्षकांची प्रशंसा मिळवून दिली. दिग्दर्शक ओनिरच्याआय ॲम या समीक्षकांनी प्रशंसित अँथॉलॉजी चित्रपटात भ्रष्ट पोलीस अधिकारी म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल त्याला प्रशंसाही मिळाली.
२०१७ मध्ये, त्याने मॉम चित्रपटात श्रीदेवीसोबत काम केले. सिंग यांनी दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यासोबत जिनियस (२०१८) या चित्रपटासाठी काम केले होते ज्यात त्यांनी सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका केली होती.