Jump to content

आयना का बायना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयना का बायना
दिग्दर्शन समित कक्कड
निर्मिती अमर कक्कड,
पुष्पा कक्कड,
समित कक्कड
कथा राजू कुष्टे,
सुचित्रा सावंत
पटकथा समित कक्कड
संवाद हेमंत एदलाबादकर,
भालचंद्र झा,
सचिन दरेकर,
प्रदीप राणे
संकलन राहुल भातणकर
छाया संजय जाधव
गीते बाबा चव्हाण,
जितेंद्र जोशी
संगीत अजित परब,
समीर म्हात्रे
नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव,
रोहन रोकडे
वेशभूषा स्वप्नील कांबळे,
दीपा आश्विन मेहता,
अनिता संझगिरी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २९ नोव्हेंबर, इ.स. २०१२
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

आयना का बायना हा इ.स. २०१२ साली प्रदर्शित झालेला, समित कक्कड दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. हिपहॉप नृत्यशैलीतील नाचांमुळे विशेष प्रसिद्ध पावलेल्या या चित्रपटात ९ युवक नृत्यकलाकारांसोबत सचिन खेडेकर, अमृता खानविलकर, संतोष जुवेकर, राकेश बापट आणि गणेश यादव यांनी अभिनय केला आहे.

पात्रयोजना

[संपादन]
कलाकारपात्राचे नावनाते/टिप्पणी
अखिलेश विश्वकर्माबाइक राजा
संकेत फरादजोसेफ
दिनेश कांबळेपुत्रन
राहुल कुलकर्णी
आनंद चव्हाण
प्रवीण नायरटोचन
निखिल राजे महाडिकपेले
सिद्धेश पैचुट्टन
रोहन रोकडेसॅंपल
सचिन खेडेकरहर्षवर्धन साठेबालसुधार गृहाचा मुख्याधिकारी
अमृता खानविलकरशिवानी साठेहर्षवर्धन साठे याची मुलगी
राकेश बापटसागर
गणेश यादवकिशोर कदमपोलीस अधिकारी
संतोष जुवेकरस्पर्धेचा सूत्रसंचालक
जयवंत वाडकरचुट्टनचे वडील
छाया कदमचुट्टनची आई
सुलभा आर्यपुत्रनची आई

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर संवादलेखकांच्या श्रेयनामावलीवरून संवादलेखक सचिन दरेकर व दिग्दर्शक समित कक्कड यांच्यादरम्यान मतभेद व वाद उद्भवले [][]. चित्रपटाचे सर्व संवाद आपण नव्याने लिहून दिले असतानाही[], आपल्यासह अन्य तीन संवादलेखकांचीही नावे चित्रपटाच्या श्रेयनामावलीत आहेत, असे दरेकरांचे म्हणणे होते. तर चित्रपटासाठी ज्यांनी केवळ दोन प्रसंगही लिहून दिलेले असतील, अशांचाही उल्लेख श्रेयनामावलीत आवश्यक होता, असे समित कक्कडांचे मत होते [].

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. 1 2 "'आयना का बायना' संवादलेखनावरुन वाद". २५ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  2. 1 2 "'आयना का बायना', वाद काही मिटे ना!". २५ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]