आयट्यून्स
Jump to navigation
Jump to search
आयट्यून्स ही ॲपल या कंपनीने बनवलेली प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे आयपॉड वा आयफोन यांच्या फोटो, चलचित्रे व संगीत या सगळ्यांचे योजन केले जाते. तसेच या द्वारे आपण एकदा ॲपल विक्री विभागाशी (ॲपल स्टोअर) क्रेडिटकार्डाची माहिती देऊन करार केला की आयपॉड टच व आयफोन साठी लागणारी अनेक प्रकाची ॲप्लिकेशन्स उतरऊन घेता येतात. यात काही फुकट असतात तर काही विकत.
पॉडकास्टींगसाठी ही प्रणाली खुपच लोकप्रिय आहे.
कोणत्याही आयपॉड मध्ये आयट्यून्स या ॲपल निर्मित प्रणाली द्वारेच गाणी भरता येतात व नियोजनही करता येते. आयट्युन्स शिवाय ॲमेरॉक, जीनोम लिसन, बानशी, फ्लूला, जीटीकेपॉड, मिडियामंकी, यमीपॉड, रिदमबॉक्स हे सुद्धा इतर आयट्युन्स सारख्याच प्रणाल्या आहेत. मात्र त्या इतर अनेक सुविधाही देऊ शकतात. तसेच या प्रणाल्या ॲपलच्या नाहीत.