आकाशदिवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिवाळीसाठी वापरले जाणारे आकाशकंदील

हा दिवा उंच टांगलेला असतो त्याच्याभोवती रंगीबेरंगी व कलात्मक आवरण असते. आकाशदिव्यालाच आकाशकंदील असेही म्हटले जाते. दिवाळीत हे दिवे लावण्याची प्रथा आहे. या दिव्यांभोवती शोभिवंत कागदी आवरण घातलेले असते. कागदाबरोबरच काच, प्लॅष्टिक किंवा धातूंची जाळीदार आवरणेही वापरतात. या आवरणांच्या बांधणीत वेगवेगळ्या कल्पना वापरलेल्या असतात. भारतातील दीपावलीप्रमाणेच चीनजपानमध्येही वेगवेगळ्या प्रसंगांनुसार आकाशदिव्यांच्या वापराची प्रथा आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.