आंद्रे अयेव
Appearance
आंद्रे मॉर्गन रामी अयेव (André Morgan Rami Ayew; १७ डिसेंबर १९८९ , सेक्लिन, फ्रान्स) हा घानाचा एक फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून घाना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला अयेव आजवर २०१० व २०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २००८ व २०१० आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांमध्ये घानासाठी खेळला आहे. क्लब पातळीवर अयेव २००७ पासून लीग १मधील ऑलिंपिक दे मार्सेल ह्या क्लबासाठी खेळत आहे.
अब्दुल रहिम अयेव व जॉर्डन अयेव हे घाना राष्ट्रीय संघामधील फुटबॉल खेळाडू आंद्रे अयेवचे सख्खे भाऊ आहेत.