Jump to content

अस्तु (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अस्तु या पानावरून पुनर्निर्देशित)
Astu (id); अस्तु (चित्रपट) (mr); Astu (en); アストゥ (ja) película de 2015 dirigida por Sumitra Bhave y Sunil Suktankar (es); pinicla de 2015 dirigía por Sumitra Bhave y Sunil Suktankar (ext); film de Sumitra Bhave et Sunil Suktankar, sorti en 2015 (fr); 2015. aasta film, lavastanud Sumitra Bhave ja Sunil Suktankar (et); película de 2015 dirixida por Sumitra Bhave y Sunil Suktankar (ast); pel·lícula de 2015 dirigida per Sumitra Bhave i Sunil Suktankar (ca); 2015 film by Sumitra Bhave and Sunil Suktankar (en); Film von Sumitra Bhave und Sunil Suktankar (2015) (de); filme de 2015 dirigido por Sumitra Bhave e Sunil Suktankar (pt); film út 2015 fan Sumitra Bhave en Sunil Suktankar (fy); film din 2015 regizat de Sumitra Bhave și Sunil Suktankar (ro); スミトラ・バーヴェ&スニール・スクサンカールによる2015年の映画 (ja); film från 2015 regisserad av Sumitra Bhave och Sunil Suktankar (sv); filme de 2015 dirigit per Sumitra Bhave e Sunil Suktankar (oc); film uit 2015 van Sumitra Bhave–Sunil Sukthankar (nl); cinta de 2015 dirichita por Sumitra Bhave y Sunil Suktankar (an); film del 2015 diretto da Sumitra Bhave e Sunil Suktankar (it); סרט משנת 2015 (he); 2015 film by Sumitra Bhave and Sunil Suktankar (en); filme de 2015 dirixido por Sumitra Bhave e Sunil Suktankar (gl); فيلم أنتج عام 2015 (ar); film India oleh Sumitra Bhave–Sunil Sukthankar (id); фільм 2015 року (uk)
अस्तु (चित्रपट) 
2015 film by Sumitra Bhave and Sunil Suktankar
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
मूळ देश
पटकथा
दिग्दर्शक
  • Sumitra Bhave
  • Sunil Sukthankar
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. २०१५
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अस्तु: सो बी इट (किंवा अस्तु) हा २०१५ मधील सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित मराठी चित्रपट असून मोहन आगाशे, इरावती हर्षे, मिलिंद सोमण आणि अमृता सुभाष यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट संस्कृत अभ्यासक डॉ. चक्रपाणी शास्त्री यांच्याविषयी आहे, जे अल्झायमर रोगाने ग्रस्त आहेत व आगाशे त्यांची भूमिका साकारतात.

कथानक

[संपादन]

अप्पा म्हणून ओळखले जाणारे डॉ. चक्रपाणी शास्त्री (मोहन आगाशे) हे संस्कृतचे निवृत्त प्राध्यापक आणि पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी संचालक आहेत. शास्त्री सध्या राम (ओम भूटकर) या आपल्या तरुण विद्यार्थ्यांसह राहतात जो त्यांची काळजी घेतो. त्यांना अल्झायमर रोगाच्या प्रगत अवस्थेचे निदान झाले आहे. एके दिवशी रामला परीक्षेला जाण्यासाठी शास्त्रीची मोठी मुलगी इरा (इरावती हर्षे) शास्त्रींना तिच्या घरी घेऊन गेली. घरी परत जाताना इरा एका दुकानात थांबली आणि शास्त्रींना गाडीमध्येच रहाण्याची विनंती केली. कारमध्ये बसलेल्या शास्त्रींना रस्त्यावरून जाणारा हत्ती दिसतो. ते मोहित होतात, स्वतःला गाडीतून खाली उतरवतात आणि शहराच्या गल्ल्यांमधून हत्तीचा मागोवा घेऊ लागतो. जेव्हा इरा परत येते आणि वडिलांना गाडीतून हरवलेली बघते तेव्हा ती आणि तिचा नवरा माधव (मिलिंद सोमण) वेगवेगळ्या ठिकाणी शास्त्रीचा शोध घेण्यास सुरुवात करतात आणि शेवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवतात.

लक्ष्मी हत्तीचा पाठपुरावा करीत असताना तिचा महूत अन्ता (नचिकेत पूर्णपत्रे) शास्त्रींना परत आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न करतो. तथापि, शास्त्रींना काहीच आठवत नाही आणि शेवटी ते महूतच्या घरी पोहोचतात जिथे महूतची पत्नी चन्नम्मा (अमृता सुभाष) भेटते. ती आपल्या नवजात मुलासह शास्त्रीची काळजी घेते आणि त्यांना एक नवीन कुटुंब देते. इरा देविकाला (देविका दफ्तरदार, शास्त्रीची धाकटी मुलगी) यांना त्यांच्या हरवलेल्या वडिलांविषयी माहिती देते. पण देविका घडलेल्या घटनेसाठी इराला दोषी ठरवते आणि त्याच्यासाठी वृद्धाश्रम सुचवते. पोलिस हत्तीचा ठावठिकाणा शोधतात आणि शास्त्रीचे अपहरण केल्याचा आरोप महूतावर करतात. शास्त्री पुन्हा इराला जाण्यास नकार देतात आणि चन्नम्मा सोबत राहायचे ठरवतात. पण इरा त्यांना पटवते आणि पोलिसांना सर्व आरोप मागे घेण्याची विनंती करते. शास्त्री शेवटी इरा सोबत घरी परततात.

निर्माण

[संपादन]

अभिनेता मोहन आगाशे यांच्याकडे अल्झायमर रोगाशी संबंधित एका प्रकल्पाच्या कल्पनेसह मराठी लघुपट निर्मात्यांनी संपर्क साधला. आगाशे यांना ही कल्पना आवडली असली, तरी संहितेवर ते समाधानी नव्हते आणि चित्रपट निर्मात्याला सुधार करण्यास सुचविले. तथापि, संहितेतील सुधारणा असूनही आगाशे यांना त्यात मर्यादा आढळल्या. नंतर, त्यांनी चित्रपट निर्मात्याला सुमित्रा भावेला भेटायला सांगितले. भावेंनी संहितेवर एक महिन्यासाठी काम केले आणि त्याचे परिपूर्ण चित्रपटात रूपांतर केले. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर एका सह-निर्मात्याने पोस्ट-प्रॉडक्शनचा आर्थिक मदत करण्यास नकार दिला. बाकीचे काम पूर्ण करण्यासाठी आगाशे यांनी पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीतून हातभार लावला.[]

हा चित्रपट २०१३ मध्ये पूर्ण झाला असला तरी, त्याला कोणतेही वितरक सापडले नाही आणि २०१६ मध्ये क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून प्रदर्शित झाला.[] [] २०१४ मध्ये हा पुण्यात रिलीज झालेला असला तरी महाराष्ट्र राज्य चित्रपट अनुदानासाठी पात्र होण्यासाठी हा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला, ज्यासाठी हा चित्रपट राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये प्रदर्शित होणे आवश्यक आहे.[] न्यू यॉर्क फिल्म फेस्टिव्हल येथे त्याचे प्रदर्शनही करण्यात आले. मानवी सुसंवाद नसल्यामुळे व वृद्धांच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये एक विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली ज्यानंतर मोहन आगाशे यांच्या सहभागासह पॅनेल चर्चेत प्रोफेसर आर्थर क्लेनमन आणि डायना एल. एॅक पण होते.[]

पुरस्कार

[संपादन]

अल्झायमर / डिमेंशिया आणि त्यातील मुख्य भूमिकेच्या अभिनयाबद्दल चित्रपटाचे कौतुक झाले. द हिंदूच्या नम्रता जोशी लिहितात की जरी या चित्रपटाचे कथानक विस्मरणाबद्दल असले तरी रचना ही आठवणींच्या मालिकेभोवती तयार केली गेली आहे.[] पुढे त्या लिहितात की अल्झायमर रोगाबद्दल चित्रपट जागरूकता निर्माण करतो पण प्रवच न देता तो संवेदनशील आहे. टाईम्स ऑफ इंडियाचे मिहीर भानगे लिहितात की उत्कृष्ट कामगिरीसह उत्कृष्ट कथा आणि दिग्दर्शन या चित्रपटाचे उच्च बिंदू आहेत.[]

२०१४ च्या मिफ्ता मधे १० नामांकन मिळवून चित्रपटास ३ पुरस्कार मिळाले: सर्वोत्कृष्ट अभिनेता (आगाशे), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (हर्षे), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (सुभाष).[] ६१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुभाषला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार आणि भावे यांना सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार प्राप्त झाला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Dundoo, Sangeetha Devi (29 September 2015). "'Astu', a state of acceptance". The Hindu. 27 July 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Astu: So Be It: A hard-hitting Film on Value of Relationships needs your support for theatrical release! By: Sheelaa Rao". Catapooolt. 4 May 2017 रोजी पाहिले.
  3. ^ Raikwar, Reshma (17 July 2016). "चित्ररंग: कोहमपर्यंत नेणारा प्रवास". Loksatta (Marathi भाषेत). 27 July 2016 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ Shedde, Meenakshi (17 July 2016). "Astu: So Be It". Mid-Day. 4 May 2017 रोजी पाहिले.
  5. ^ Meenakshi Rohatgil (6 June 2015). "Harvard watches Marathi film on Alzheimer's". The Times of India. 19 June 2017 रोजी पाहिले.
  6. ^ Joshi, Namrata (15 July 2016). "Astu: Inside a beautiful mind". The Hindu. 27 July 2016 रोजी पाहिले.
  7. ^ Bhanage, Mihir (18 July 2016). "Astu Movie Review". The Times of India. 27 July 2016 रोजी पाहिले.
  8. ^ "Nominations for MICTA films, theatre awards". Rangmarathi. 7 September 2014. 2020-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 January 2017 रोजी पाहिले.
  9. ^ "61st National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 16 एप्रिल 2014. 16 एप्रिल 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 16 एप्रिल 2014 रोजी पाहिले.