मिलिंद सोमण
Jump to navigation
Jump to search
मिलिंद सोमण हा भारतीय मॉडेल आणि अभिनेता आहे. मिलिंदचा जन्म स्कॉटलंडमध्ये नोव्हेंबर ४ १९६५ रोजी झाला. तो पहिली सात वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले
कारकीर्द[संपादन]
मिलिंदला कारकीर्दीच्या सुरूवातीला जलतरणपटू व्हायचे होते. त्याने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या मिलींदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. गायिका अलिशा चिनॉय हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या भूमिकेपासून मिलींद प्रकाशझोतात आला. मात्र अभिनेता म्हणून मिलींद कारकीर्द कमीच यशस्वी राहिली. त्याने मराठी ,हिंदी आणि तमिळ चित्रपटातुन अभिनय केला आहे.