अल्झायमर रोग (इंग्रजी : Alzheimer's disease) हा मेंदू चा आजार आहे. हा मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट करतो आणि कालांतराने गंभीर होतो.
अल्झायमर (इंग्रज़ी : Alzheimer's Disease) रोग 'विसरण्याचा आजार'आहे. याचे नाव अलाॅईस अल्झायमरवरून ठेवले आहे त्यानेच सर्वात अगोदर या रोगाचे विवरण केले. या आजाराच्या लक्षणात स्मरणशक्ती नष्ट होते. शिवाय, निर्णय घेण्यात असमर्थ असणे, बोलण्यास अडचण येणे आणि यामुळे सामाजिक आणि पारिवारिक समस्यांची गंभीर स्थिति होणे इत्यादी होते. रक्तदाब, मधुमेह, आधुनिक जीवनशैली आणि डोक्याला अनेकवेळा मार लागणे हे आहे. मार लागल्याने या आजाराचे प्रमाण वाढण्याची आशंका वाढते. ६० वर्षे वयाच्या जवळपास वय असणाऱ्या लोकांमध्ये या आजार उद्भवू शकतो. या आजारावर काही स्थायी उपाय नाही.
.
आजाराच्या सुरुवातीला नियमित तपासणी आणि उपचाराने नियंत्रण ठेवू शकतो. मस्तिष्कच्या स्नायूंच्या क्षरणाने पेशंटच्या बौद्धिक क्षमता आणि व्यावहारिक लक्षणांत पण फरक पड़तो.
माणूस जसजसा म्हातारा होत जातो तसतशी त्याची विचार करण्याची आणि स्मरणाची क्षमतापण कमजोर होत जाते. पण याचे गंभीर होणे अल्झायमरचे सुरुवातीचे लक्षण आहे. मेंदूमध्ये शंभर अब्ज कोशिका (न्यूरॉन) असतात. प्रत्येक कोशिका अन्य कोशिकांबरोबर संवाद करून एक नेटवर्क बनवते. या नेटवर्कचे काम विशेष असते. काही विचार करतात, काही शिकतात आणि काही स्मरणात ठेवतात, तर अन्य कोशिका आपल्याला ऐकण्यासाठी, वास घेण्यासाठी इत्यादींमध्ये मदत करतात.
यांव्यतिरिक्त काही कोशिक माणसाच्या मांसपेशींना काम करण्याचे आदेश देतात.
आपले काम करण्यासाठी मेंदूच्या कोशिका लघु उद्योगासारखे काम करतात. त्या पुरवठा घेतात व ऊर्जा निर्माण करण्यात मदत करतात. अवयवांची निर्मिती करतात आणि बेकार वस्तूंना बाहेर काढतात. कोशिका सूचनांना जमा करतात आणि मग त्यांचे प्रसंस्करणपण करतात. शरीर काम करत रहावे म्हणून समन्वयायाबरोबरच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि इंधनाची गरज असते. अल्झायमर या रोगात कोशिकांचा काही हिस्सा काम करणे बंद करतो, त्यामुळे इतर कामांवरही प्रभाव पडतो. कोशिकांमध्ये काम करण्याची ताकत कमी होत जाते आणि अंततः त्या मरतात.
हा वाढणारा आणि खतरनाक मेंदूरोग आहे. याच्यामुळे विचार करण्याची शक्ती हळूहळू कमी होत, पुढे नष्ट होते. हा रोग डिमेंशियाचे (विस्मरणरोगाचे) सामान्य रूप आहे.
अलझायमर चा प्रभाव सामाजिक जीवनावर पडतो.
10 चेतावनी संकेत
स्मरणशक्ती समाप्त होणे– दिलेल्या सूचना लगेचच विसरून जाणे हे डीमेंशिया चा सर्वात सामान्य आरंभिक लक्षण आहे.व्यक्ति बरेचदा विसरतो आणि नंतर त्याला कितीही केले तरी लक्षात राहत नाही.
सामान्य कामकाज करण्यात अवघड- डीमेंशिया ने पीड़ित व्यक्ति दैनिक कामकाजातील योजना बनविने आणि ते कार्यान्वित करणे त्याला नेहमीच जड जाते. बरेच व्यक्तींना तर जेवन बनवायला, टेलीफोन करायला किंवा एकादे खेळ खेळायला जड जाते.
भाषा बरोबर समस्या- अल्जाइमर आजाराशी त्रस्त पेशंट साधारण शब्द किंवा असामान्य समानार्थक शब्द विसरायला लागताे. त्याची बोली किंवा लिखान अस्पष्ट होत जाते. उदाहरणार्थ तो टूथब्रश विसरून जातो.
वेळ आणि स्थानात असमन्वय- अल्जाइमर चा पेशंट अापल्या शेजारी हरवुन जातो तो हें विसरून जातो की तो कुठे आहे, तेथे तो कसा आला आणि आता घरी कसे जायचे.
वेळ आणि स्थान मध्ये असमन्वय- अल्जाइमर चा पेशंट अापल्या शेजारी पण हरवतो, तो हे विसरून जातो की तो त्या ठिकाणी कुठुन आला आणि आता घरी कसे जायचे.
निर्णय घेण्यात समस्या आणि चुकीचा निर्णय- अल्जाइमर चा पेशंट अव्यवस्थित कपड़े घालू शकतो गरमी मध्ये खूप कपड़े किंवा थंडीत एकदम कमी कपड़े घालतो. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता कमी असते. तो अनोळखी व्यक्ति ला खूप सारे पैसे देऊ शकतो.
संक्षिप्त विचारांमध्ये समस्या- अल्जाइमर चा पेशंट ला कठिन मानसिक कार्यात असामान्य परेशानी वाटु शकते.
वस्तू यत्र-तत्र ठेवणे- अल्जाइमर चा पेशंट वस्तू ला यत्र-तत्र ठेवून देतो. उदाहरणार्थ आयरन (इस्तरी) ला फ्रिज मध्ये ठेवू शकताे.
मूड या स्वभाव मध्ये बदलाव- अल्जाइमर चा मरीज अापल्या स्वभाव मध्ये एकदम बदलाव प्रदर्शित करताे. जसे की तो अकारण ही रडायला लागतो किंवा राग करने किंवा हसायला लागतो.
व्यक्तित्व मध्ये बदलाव- डीमेंसिया ने पीड़ित व्यक्ति नाटकीय ढंगाने बदलु शकतो. तो खुप गुंतागुंतीत असतो, संदेह करणारा, भयभीत किंवा कोणत्या तरी नातेवाईक वर अत्यधिक निर्भर बनतो.
प्रयत्न करण्यात अक्षमता- अल्जाइमर चा पेशंट निष्क्रिय, टीवी च्या समोर तासनतास बसणारा, खुप जास्त झोपणारा तसेच सामान्य क्रियाकलाप पूर्ण करण्यात अनिच्छुक होऊ शकताे.
जर तुम्हाला स्वतः मध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये या पैकी कोणते चेतावनी संकेत दिसले तर तत्काळ कोणत्या तरी चिकित्सक ला संपर्क करा. अल्जाइमर किंवा डीमेंशिया ला कारणीभूत गड़बड़ींना ओळखुन त्या वर वेळीच उपचार करने तसेच सहयोग तथा समर्थन खुप महत्त्वपूर्ण आहे.