अलक्ष्मी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अलक्ष्मी

दुर्भाग्य - इत्यादींची अधिपती देवता

मराठी अलक्ष्मी
संस्कृत अलक्ष्मीः
निवासस्थान नरक
लोक नरक,निऋती
वाहन गाढव,कावळा
शस्त्र केरसुणी,कपालपत्र,तलवार
पती कलि (राक्षस)
अपत्ये मृत्यु,अधर्म
अन्य नावे/ नामांतरे ज्येष्ठा देवी,निऋती
या अवताराची मुख्य देवता निऋती,धुमावती
मंत्र "Alakshmim krishnavarnamcha krodhanam kalahapriyam,

Krishnavastram paridhanam lauhavaranabhushitam. Vagnasanasham dwibhujam sharkaraghrishtachandanam, samarjanisabyastahastam dakshina hastasurpakam. Tailavyangitagatramcha gardhavaroham bhaje."

नामोल्लेख पद्मापुराण, विष्णु पुराण लिगंपुराण, कल्किपुराण,श्रीसुक्त

अलक्ष्मी (Devanāgari: अलक्ष्मी; from the roots अ (a): "not" and लक्ष्मी (Lakshmi): "goddess of fortune") means "not Lakshmi") ही हिन्दू धर्मात दुर्भाग्याची देवी आहे .

अशुभ, पाप ,दरिद्रता,वेदना, क्लेश,अंधार,विनाशाची अधर्माची देवता असल्याचे म्हटले जाते. केरसुणी आणि कावळा व कपाल, राक्षसाची चिन्हे तिची चिन्हे आहेत

गाढव हे तिचे वाहन असते.अलक्ष्मी नरकमध्ये निवास करते.

कल्किपुराण[संपादन]

कल्किपुराणानुसार अलक्ष्मी कलिराक्षसाची दुसरी पत्नि . अधर्म आणि हिंसाची मुलगी .मृत्युची , अधर्माची माता आहे . आळशी, खादाड, मत्सर, क्रोध, ढोंगीपणा, लोभ आणि वासना असत्य .अस्वच्छता, अनीती, भ्रष्टाचार, अज्ञान कलियुगात (जुगार खेळ,शराब,वेश्याव्यवसाय,कत्तल,लोभ, सोने) येथे राहणे अलक्ष्मीला आवडते.


अन्य नाव[संपादन]

धुमावती 10 महाविद्यांपैकी एक मानली जाते.

ज्येष्ठा देवी लक्ष्मीची मोठी बहीण आहे. ज्येष्ठादेवी तसेच 'अक्काबाई' म्हणून प्रसिद्ध आहे.

कलहप्रिया,आमिषप्रिय (मांसाहार)

ऋग्वेदात निऋती (अष्ट-दिक्पाल[१])आठ दिसामधील नैऋत्य दिशा ; दक्षिण आणि पश्चिम या दिशांमधील उपदिशा (नाश ; मृत्यु ; नैऋत्य दिशेची देवता )

निऋती वा ज्येष्ठा देवी दोन्ही अलक्ष्मीचे स्वरुप आहे.

वैदिक ज्योतिष[संपादन]

ज्येष्ठ नक्षत्र आणि मूल नक्षत्र दोन गोष्टी साम्य आहेत: दोघांनाही “भयानक” नक्षत्र मानले जाते कारण

वैदिक ज्योतिषात मूल नक्षत्राचा स्वामी ग्रह केतू आहे, नक्षत्र देवता निऋती आहे आणि

ज्येष्ठ नक्षत्राचा स्वामी ग्रह बुध ,नक्षत्र देवता इंद्र आहे,ज्येष्ठा देवी ज्येष्ठ नक्षत्रावररून नाव पडले असावे.

प्रथा[संपादन]

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्‌मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मध्यरात्रीनंतर सुप व दिमडी वाजवून अलक्ष्मीला हाकलून देण्‍याची प्रथा आहे.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कर्कश वाद्ये, फटाके वाजविणे ,मांसाहार टाळावे, कारण त्यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करीत नाहीत.

पौराणिक कथा[संपादन]

लिंगमहापुराणानुसार आणि पद्‌मपुराणात समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. पण या ज्येष्ठाचा हात धरायला कोणी तयार होईना. शेवटी कपिल मुनींनी ( दु:सह मुनि) तिच्याशी लग्न केल्याची कथा आहे.

समुद्राच्या मंथनात हलाहल विष सोडल्यानंतर, ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला.

ततो ज्येष्ठा समुत्पन्ना काषायाम्बरधारिणी।

पिंगकेशा रक्तनेत्रा कूष्माण्डसदृशस्तनी।।अतिवृद्धा दन्तहीना ललज्जिह्वा घटोदरी।यां दृष्ट्वैव च लोकोऽयं समुद्विग्नरू प्रजायते।।[२]

शिल्प[संपादन]

मुखेड येथील महादेव मंदिरात अलक्ष्मी चे शिल्प कोरलेले आढळते. एका हातात सुरा आणि एका हातात कपालपात्र धरलेले दिसते. कानात कुंडले तर डोक्यावर मुकुट घातला असून तिच्या डाव्या खांद्यावरून लोंबणारी एक मुंडमाळा आहे. तिच्या शेजारीच तिचे वाहन गाढव हे दिसते आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Guardians of the directions". Wikipedia (en मजकूर). 2019-04-17. 
  2. ^ "दरिद्रा माता लक्ष्मी की बहन". Sakshambano (english मजकूर). 2019-08-18 रोजी पाहिले.