अगर
अगर हा एक एक मोठा वृक्ष आहे. हा भारतातील ईशान्येकडील हिमालयीन प्रदेशात विशेषतः त्रिपुरा, भूतान, बंगाल गारो, खांसिया, नागालॅंड, काचार, सिल्हेट वगैरे इलाख्यांतील जंगलांत आढळतो. हा भारतातील त्रिपुरा राज्याचा राज्यवृक्ष आहे.याच्या खोड़ाला लागलेली बुर्शी पासून खोड काळे होते ते उपयुक्तांग आहे.
वर्णन
[संपादन]हा एक सुगंधी वृक्ष आहे. यात कृष्णागरु, दाहागरु, काष्ठागरु, स्वादगरु, मंगल्यागरु इत्यादी उपभेद आहेत. देवासमोर भक्तिभावाने लावली जाणारी सुगंधी अगरबत्ती ही पूर्वी अगर वृक्षाच्या काण्डसारापासूनच तयार केली जात होती. म्हणूनच तिला ‘अगरबत्ती’ हे नाव मिळाले. अगरू म्हणजेच अॅक्विलारिया अॅगाल्लोचा. या झाडाच्या नैसर्गिक सुगंधी काण्डसाराच्या निर्यासापासून धूप करण्यास बनविलेली काडी म्हणजेच ‘अगरबत्ती’. आजच्या आधुनिक काळात अनेक प्रकारच्या कृत्रिम सुगंधी अगरबत्त्यांचा वापर वाढला आहे. त्याने सुगंधाचा क्षणिक आनंद मिळतो; परंतु पर्यावरण रक्षणाचा, वातावरण र्निजतुकीकरणाचा रक्षोघ्न गुण त्यात नाही म्हणून नवरात्रीच्या निमित्ताने तरी खऱ्या अगरूचाच धुपनार्थ उपयोग करून वातावरण शुद्ध ठेवले पाहिजेत. या अगरूला बंगाल, गुजराथमध्ये अगर, तर पंजाबमध्ये ऊद म्हणतात. अगर निर्यासाच्या रंग व सुगंधावरून चार प्रकार आढळतात. १) कृष्णागरू, २) काष्ठागरू, ३) दहागरू, ४) मंगलागरू. हा अगरू वृक्ष उत्तर भारतात हिमालय, आसाम, मणिपूर, बांगलादेश, भूतान, ब्रह्मदेश, सुमाना येथे सहज सर्वत्र आढळतात. हा अगरू २० मीटपर्यंत उंचीचा सदाहरीत वृक्ष असतो. याच्या बुंध्याची साल कागदाप्रमाणे पातळ असल्याने पूर्वी तिचा भूर्जपत्राप्रमाणे लिहिण्यासाठी उपयोग करीत असत. याचे खोड पांढरे पिवळसर व मऊ असते. त्याला गंध नसतो, पण हा वृक्ष जुना झाल्यावर कृमिमुळे किंवा एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे खोडाच्या आतील सालीत तैलीयराळ (एसिन) तयार होते. ज्यामुळे अगरू खोडात काळसर रंग, जडपणा व सुगंध निर्माण होते. हाच ‘कृष्णागरू’ होय. हा अतिशय सुगंधी, पाण्यात बुडणारा, जड, असा श्रेष्ठ अगरू असतो. जळताना अधिकच सुगंध दरवळतो. ५० वर्ष जुन्या वृक्षापासून ३-४ किलो अगरू निर्यास मिळतो. या अगरूच्या फांद्या वेडय़ावाकडय़ा असून त्याचे खोड नरम असते. त्याचा औषधात उपयोग होतो. याची चव कडवट, तुरट, तेलकट असते. यापासून मिळणारे तेल त्वचारोगात लेप लावण्यासाठी वापरतात. सुगंधामुळे हे तेल उत्तेजक आहे. या तेलाचा कानात टाकून कर्णरोग निवारणासाठी उपयोग होतो. कोडाचे पांढरे डाग कमी होण्यास अगरू तेल लावतात. सांधेदुखीतही वेदनास्थानी तेल चोळतात. सर्दी, खोकला, दमा अशा श्वासाच्या विकारात अगरूचे १-२ थेंब तेल विडय़ाच्या पानात टाकून खायला देतात. नस्य करण्यास नाकातही थेंब टाकतात. बाजारात उपलब्ध अणूतेलातील अगरू हा महत्त्वाचा घटक आहे. अगरूची उत्पत्ती थंड प्रदेशात होते. याचा प्रमुख उपयोग शीत प्रशमन म्हणजेच थंडीपासून निवारण करणे होय. अगरु गरम असल्याने थंडीत याचा लेप लहान मुले, वृद्धलोक यांच्या तळ हातपाय, छातीवर, कापडावर लावतात किंवा अगरू तेल गरम करून चोळतात. मालीश करतात. मुखाची दरुगधी कमी करण्यास अगरूचा तुकडा सुपारीप्रमाणे तोंडात धरतात. याने अपचनाचे विकार, पोटाचा फुगारा व वायुदोष कमी होतो. लहान मुलांमध्ये होणाऱ्या शय्यामूत्रतेत म्हणजे झोपेत अंथरूण ओलं करणे यात दोन थेंब दुधात टाकून देतात. सुगंधी उटण्यातही अगरू वापरतात. वस्त्राला सुगंध येण्यास अगरूचा तुकडा कपडय़ात ठेवतात. अगरूपासून इसेन्स, परफ्यूम बनवितात. थकवा घालविण्यास याचे चूर्ण पाण्यात टाकून घेतल्यास याने हुशारी वाढून तरतरीतपणा येतो. असा अगरू औषधी उपयोगी असला तरी महाग आहे;
उत्पत्तिस्थान
[संपादन]भारतात मलयगिरी व दक्षिणेस
उपयोग
[संपादन]सर्वसाधारण - सुगंधी असल्यामुळे धूप, अगरबत्ती, उटणे, फेस पॅक इत्यादींसाठी उपयोगी. यापैकी कृष्णागरु हा आर्द्रा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
आयुर्वेदानुसार - दाह, वल्मीक, उठाणू इत्यादी रोगांवर
अगर वृक्षाच्या बुरशी आलेल्या खोडापासून सुगंधी द्रव्ये बनतात. झाडाच्या ढलप्यांमधून अंशतः तेल काढून घेतल्यानंतर उरलेल्या ढलप्याच्या अगरबत्त्या (उदबत्त्या) बनतात.
अगरवृक्षाची अन्य नावे
[संपादन]अगरूला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -