आर्द्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आर्द्रा हे आकाशातील २७ नक्षत्रांपैकी एक नक्षत्र आहे. इंग्रजीत याला Athena किंवा Gamma Geminorum म्हणतात. हिंदू ज्योतिषशास्त्रात मानल्या गेलेल्या राहू या ग्रहाची ही देवता समजली गेली आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
नक्षत्र Astrologia-tynkä.jpg
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती

भारतीय २७ नक्षत्रांपैकी सहावे नक्षत्र. यात एकच तारा मानतात. या ताऱ्याचे पाश्चात्य नाव गॅमा जेमिनोरम (अ‍ॅल‌्हेना‍‌‌) असून त्याचे विषुवांश ६ ता. ३४ मि., क्रांती १६०२७’, प्रत १.९३ [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति; प्रत] आहेत. २१ जूनच्या सुमारास सूर्य या नक्षत्रात प्रवेश करतो. आर्द्र म्हणजे ओले. हे पावसाचे महत्त्वाचे नक्षत्र असल्याने हे नाव पडले असावे. याचा समावेश मिथुन राशीमध्ये होतो. कोणता तारा आर्द्राचा मानावा याबाबत मतभेद आहेत. कोणी कांक्षि वा कक्ष म्हणजे आल्फा ओरिऑनिस (बेटलज्यूझ) हा, तर कोणी व्याधाचा ताराही आर्द्राचा मानतात. परंतु कांक्षि हा मृगातील समजणे इष्ट आणि व्याधाचाही मृगाशीच संबंध असतो. म्हणून गॅमा जेमिनोरम हाच आर्द्राचा मानणे युक्त, असे शं. बा. दीक्षित यांचे मत आहे. या नक्षत्राची देवता रुद्र व आकृती मणी मानली आहे.

                    ठाकूर, अ. ना.(स्त्रोत: मराठी विश्वकोश)