अगर
Jump to navigation
Jump to search
अगर हा एक एक मोठा वृक्ष आहे. हा भारतातील ईशान्येकडील हिमालयीन प्रदेशात विशेषत: त्रिपुरा, भूतान, बंगाल गारो, खांसिया, नागालँड, काचार, सिल्हेट वगैरे इलाख्यांतील जंगलांत आढळतो. हा भारतातील त्रिपुरा राज्याचा राज्यवृक्ष आहे.याच्या खोड़ाला लागलेली बुर्शी पासून खोड काळे होते ते उपयुक्तांग आहे.
उपयोग[संपादन]
अगर वृक्षाच्या बुरशी आलेल्या खोडापासून सुगंधी द्रव्ये बनतात. झाडाच्या ढलप्यांमधून अंशत: तेल काढून घेतल्यानंतर उरलेल्या ढलप्याच्या अगरबत्त्या (उदबत्त्या) बनतात.
अगरवृक्षाची अन्य नावे[संपादन]
- अरबी - ऊद
- इंग्रजी - Iron Wood, Eagle Wood
- गुजराथी - अगर
- जपानी - को
- तमिळ - आगलिचंद
- तेलुगू - अगुई
- बंगाली - अगरु
- मराठी - अगर, ऊद
- शास्त्रीय नाव - Aquilaria malaccensis
- संस्कृत - अगरि, कृमिजग्ध, लोह
- हिंदी - अगर