अक्षय विनायक पेंडसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अक्षय विनायक पेंडसे
जन्म अक्षय विनायक पेंडसे
१२ नोव्हेंबर, इ.स. १९७९ [१]
मृत्यू २३ डिसेंबर, इ.स. २०१२
मुंबई-पुणे द्रुतगतिमार्ग
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ - २०१२
भाषा मराठी
वडील विनायक पेंडसे

अक्षय पेंडसे (१२ नोव्हेंबर, इ.स. १९७९ [१] - २३ डिसेंबर, इ.स. २०१२) हा मराठी अभिनेता होता. याने मराठी नाटके, दूरचित्रवाणी, चित्रपट माध्यमांतून अभिनय केला.

जीवन[संपादन]

अक्षय पेंडसे याचे शालेय शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. त्याने पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून एम.ए. पदवी मिळवली [१]. अभिनयक्षेत्रात जम बसवण्यासाठी पुढे तो मुंबईस हलला. अमोल पालेकर यांच्या कैरी या लघुपटात त्याने भूमिका केली होती. पुढील काळात अमोल पालेकरांच्या ध्यासपर्व चित्रपटात, तसेच उत्तरायण चित्रपटात त्याने भूमिका केल्या होत्या.

कारकीर्द[संपादन]

चित्रपट-कारकीर्द[संपादन]

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
इ.स. २००० कैरी मराठी
इ.स. २००५ कायद्याचे बोला मराठी हर्षवर्धन घोडके
उत्तरायण मराठी संजय

दूरचित्रवाणी-कारकीर्द[संपादन]

वर्ष (इ.स.) कार्यक्रम भाषा भूमिका/सहभाग टिप्पणी
इ.स. २०१२ मला सासू हवी मराठी विघ्नेश रत्नपारखी

नाटक-कारकीर्द[संपादन]

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
सिगारेट मराठी
मि. नामदेव म्हणे मराठी
खरं सांगायचं म्हणजे मराठी

मृत्यू[संपादन]

एका चित्रीकरणाचे काम आटोपून पुण्याहून मुंबईकडे प्रवास करत असताना २३ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी भाप्रवेनुसार २३:३० वाजायच्या सुमारास अक्षय पेंडसे, त्याच्या सोबत असलेला आनंद अभ्यंकर यांच्या गाडीस मुंबई-पुणे द्रुतगतिमार्गावरील उर्से टोलनाक्याजवळ अपघात झाला [२]. या कारीत कारचालक, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे, तसेच त्याची पत्नी दीप्ती व मुलगा प्रत्युष (वय १.५ वर्षे) असे प्रवासी होते. या अपघातात अक्षय पेंडसे याचा दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला; तर अपघातानंतर निगडीतल्या लोकमान्य इस्पितळात उपचारादरम्यान आनंद अभ्यंकर, व पेंडसे याचा मुलगा प्रत्युष या दोघांचा मृत्यू झाला [२]. अक्षय पेंडसे याची पत्‍नी दीप्‍ती, तसेच कारचालक हे या अपघातात बचावले.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. a b c शैलेंद्र परांजपे (२५ डिसेंबर, इ.स. २०१३). "मराठी फिल्म इंडस्ट्री लूझेस टॅलेंटेड ॲक्टर (मराठी: मराठी चित्रपटसृष्टीने गुणी अभिनेता गमावला)" (मराठी मजकूर). डीएनए. ५ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. 
  2. a b "अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे निधन" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. २४ डिसेंबर, इ.स. २०१२. ५ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.