अविनाश धर्माधिकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अविनाश धर्माधिकारी (इ.स. १९५८:कोल्हापूर[१][ दुजोरा हवा] - हयात) हे भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी आहेत. ते इ.स. १९८६ साली भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्यांनी फलटण येथे विभागीय उपायुक्त, रत्‍नागिरी आणि अमरावती जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सचिव, अशा महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला. त्यांनी मार्च १, इ.स. १९९६ रोजी सेवेचा राजीनामा दिला आणि त्यानंतरपुण्यात चाणक्य मंडल परिवार ही यू.पी.एस.सी आणि एम.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी प्रशिक्षण संस्था स्थापन केली.

  चाणक्य मंडल परिवार कडून स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा तयारी मासिक आणि साप्ताहिक स्वतंत्र नागरिक या नावे अनुक्रमे मासिक व साप्ताहिक प्रकाशित होते. याची संपादकीय जबाबदारी अविनाश धर्माधिकारी यांच्यावर आहे.

अविनाश धर्माधिकारी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • १० वी - १२ वी नंतरचे कारकीर्द आणि व्यक्तिमत्त्व विकसन
  • आधुनिक भारताचा इतिहास (सीडी)
  • आपण त्यांच्या समान व्हावे (एकूण ८ व्याख्यानांची एकत्रित सीडी)
  • अवघे विश्वची माझे घर (सीडी)
  • जिंकणारा समाज घडविण्यासाठी
  • जिंकणारा समाज घडविणारी शिक्षणपद्धती
  • MPSC पूर्वपरीक्षा CSAT मार्गदर्शक
  • अस्वस्थ दशकाची डायरी (या पुस्तकाचे गौरी देशपांडे यांनी इंग्लिश भाषेत भाषांतर केले आहे.)
  • नवा विजयपथ
  • स्वतंत्र नागरिक
  • ...आणि आपण सगळेच! , वगैरे.

अविनाश धर्माधिकारी यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • पुणे सार्वजनिक संस्थेतर्फे दिला जाणारा ’सार्वजनिक काका पुरस्कार’. (३-८-२०१५)

बाह्य दुवे[संपादन]

  • "अविनाशधर्माधिकारी.नेट - चाणक्य मंडल परिवाराचे संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2011-09-03. 2011-09-17 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]