कडधान्य
Appearance
कडधान्यामध्ये हरभरा, तूर, मूग, उडीद, वाटाणा, मसूर, कुळीथ, मटकी, चवळी, सोयाबीन, इत्यादी पिकांचा समावेश होतो.
भारतातील एकूण कडधान्य उत्पादनामध्ये सर्वाधिक उत्पादन हरभऱ्याचे होते, त्या खालोखाल तूर, उडीद व मूगाचे होते. हरभऱ्याचे सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेशात, तुरीचे महाराष्ट्रात तर उडीदाचे आंध्रप्रदेशात होते.