सहाय्य:संपादन कालावधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिकर मित्रहो, मराठी विकिपीडियावर रोज थोडासा वेळ देऊन संपादन करणार्‍यांची संख्या बरीच आहे.कोणत्या संपादन कामाकरिता अंदाजे किती वेळ लागतो याचा अंदाज असेल तर खूप जास्त ताण न पडता आपण सर्वच जण नियमीत योगदान करत राहू शकतो.शक्यतो आपल्याकडे किती वेळ आहे याचा आडाखा बांधून ठेवा.खाली दिलेला वेळ तक्ता एकदम बरोबर असणे अपेक्षीत नाही आणि तसे शक्यही नाही.अगदी दोन मिनीटच हातात असतील तरी तूम्ही तूमचा वेळ सार्थकी लावून आनंदात व्यतीत करू शकता.

आपण रोज वेळ देऊ शकत असाल तर एखादा प्रकल्प निवडून अथवा नवीन प्रकल्प सुरू करून त्या संबधीत लेखात योगदान करा.त्या शिवाय आपण रोज वेळ देऊ शकत नसाल तर दिवसा आड दोन तास देण्याचा प्रयत्न करून पहा.त्या शिवाय शक्यतो महीन्याच्या सुट्ट्यांपैकी काही ठरावीक सुट्ट्या मोठ्या बैठकीकरिता काढून ठेवा म्हणजे तुमच्या आवडीचा एखादा लेख संपूर्ण लिहून काढू शकाल

वेळ वाचवण्याचे मार्ग[संपादन]

  1. विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून तुमचा वेळ वाचवा.

दोन मिनीट[संपादन]

संपादन प्रकार:

सर्व प्रकारच्या वर्गीकरणासाठी हॉटकॅट हे उपकरण वापरून पहा. यातून वर्ग शोधणे अधिक सोपे जाते.

पाच ते पंधरा मिनीट[संपादन]

संपादन प्रकार:

अर्धा तास[संपादन]

संपादन प्रकार:

  • थोडेसे पण नियमीत लेखनास उत्तम.
  • सहसा एखादा लेख निवडून ठेवून त्यात नियमीत एक एक परिच्छेद लेखन अथवा भाषांतर करण्यास उत्तम.
  • किंवा नवीन लेख सुरू करण्या करिता संदर्भ,साधन सामग्री शोधून तयार करून ठेवा.

एक तास[संपादन]

संपादन प्रकार:

  • थोडेसे पण नियमीत लेखनास उत्तम.
  • सहसा एखादा लेख निवडून ठेवून त्यात नियमीत दोन ते तीन परिच्छेद लेखन अथवा भाषांतर करण्यास उत्तम.
  • किंवा नवीन लेख सुरू करा.
  • किंवा नवीन लेख सुरू करणार्‍यां समवेत सहयोगी लेखन करा
  • किंवा नवीन लेखांना दुवे देणे आणि सर्व साधारण विकिकरणास सुयोग्य

दोन तास[संपादन]

संपादन प्रकार:

  • नवीन लेख बर्‍या पैकी आकार-रूपात सुरू करण्यास उत्तम.
  • सहसा एखादा लेख निवडून ठेवून त्यात नियमीत चार ते सहा परिच्छेद लेखन अथवा भाषांतर करण्यास उत्तम.
  • किंवा नवीन लेख सुरू करणार्‍यां समवेत सहयोगी लेखन करा
  • किंवा नवीन लेखांना दुवे देणे आणि सर्व साधारण विकिकरणास सुयोग्य
  • ज्या वर्गीकरणात पुरेसे लेख खास करून मासिक सदरात निवडले गेलेले लेख आहेत त्या वर्गीकरणा करिता दालन इतर दालनातील संक्ल्पचित्र वापरल्यास दोन तासात बर्‍या पैकी आकार येतो उदाहरण दालन:मराठवाडा

पाच तास[संपादन]

संपादन प्रकार:

  • एखाद्या लेखास व्यवस्थित न्याय देऊन आठ ते दहा परिच्छेदाचा नवीन लेख पूर्ण करण्यास उत्तम.
  • ज्या वर्गीकरणात पुरेसे लेख खास करून मासिक सदरात निवडले गेलेले लेख आहेत त्या वर्गीकरणाकरिता दालन इतर दालनातील संकल्पचित्र वापरल्यास पाच तासात छान आकार येतो. उदाहरण दालन:सूर्यमाला

आठ ते दहा तास[संपादन]

संपादन प्रकार:

  • एखाद्या लेखास व्यवस्थित न्याय देऊन आठ ते दहा परिच्छेदाचा नवीन लेख विकिकरण व व्यवस्थित संदर्भासहित पूर्ण करण्यास उत्तम.

मॅरेथॉन[संपादन]

संपादन प्रकार:

  • एखाद्या विषयाच्या दालन आणि प्रकल्पाकरिता योगदान करा.
  • एखाद्या विषयाला धरून अथवा एखाद्या लेखातील प्रत्येक दूव्याकरिताच्या लेखांसहित व्यवस्थित लेखन करण्यास उत्तम
१,००,००० चा टप्पा

सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या ९६,०१८ आहे. मराठी विकिपीडियाला १,००,००० लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त ३,९८२ लेख हवे आहेत. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.

अल्ट्रा मॅरेथॉन[संपादन]

विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प हा मराठी विकिपीडियातील माहितीत भर पडावी त्यासाठी अनेक प्रयत्नांपैकी एक असा हा प्रयत्न आहे. यानुसार दिनांक ११-११-२०११ (११-११-११) रोजी मराठी विकिपीडियातील लेख संख्या १,११,१११ इतकी व्हावी असे ध्येय आहे.त्याच प्रमाणे विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा लेख संपादनास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते.

कोण कोण आलंय[संपादन]