पवित्र रोमन सम्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पवित्र रोमन साम्राज्याच्या राज्यकर्त्यांना पवित्र रोमन सम्राट (जर्मन: Römisch-Deutscher Kaiser, रोमिश-दॉइचेर कैसर; रोमन-जर्मन सम्राट) ही पदवी असे.

या साम्राज्यात आत्ताच्या जर्मनीचा बराचसा भाग, चेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रिया, लिच्टेन्स्टेन, स्लोव्हेनिया, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, पोलंडचा बराचसा भाग व नेदरलँड्सचा काही भाग यांचा समावेश होता. काही काळासाठी यात स्वित्झरलंड, सगळे नेदरलँड्स आणि फ्रांसइटलीचेही काही भाग समाविष्ट होते.

सम्राटांची यादी[संपादन]

कॅरोलिंजियन घराणे

शार्लमेन (चार्ल्स द ग्रेट), ८००–८१४

लुइस पहिला द पायस, ८१४–८४०

लोथर पहिला, पवित्र रोमन सम्राट, ८४३–८५५

लुइस दुसरा, पवित्र रोमन सम्राट, ८५५–८७५

चार्ल्स दुसरा द बाल्ड, पवित्र रोमन सम्राट, ८७५–८७७

चार्ल्स तिसरा द फॅट, पवित्र रोमन सम्राट, ८८१–८८७

गाइडेचीचे घराणे

स्पोलेटोचा गाय तिसरा, पवित्र रोमन सम्राट, ८९१–८९४

स्पोलेटोचा लॅंबर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट, ८९४–८९८

कॅरोलिंजियन घराणे

कॅरिंथियाचा अर्नुल्फ, ८९६–८९९

लुइस तिसरा द ब्लाइंड, पवित्र रोमन सम्राट, ९०१–९०५

फ्रिउलीचा बेरेंगर, ९१५–९२४

ऑट्टोनिअन (सॅक्सन) घराणे

ऑट्टो पहिला द ग्रेट, ९६२–९७३

ऑट्टो दुसरा, पवित्र रोमन सम्राट, ९७३–९८३

ऑट्टो तिसरा, पवित्र रोमन सम्राट, ९९६–१००२

हेन्‍री तिसरा द सेंट, पवित्र रोमन सम्राट, १०१४–१०२४

सेलियन (फ्रॅंकिश) घराणे

कोन्‍राद दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १०२७–१०३९

हेन्‍री तिसरा, पवित्र रोमन सम्राट, १०४६–१०५६

हेन्‍री चौथा, पवित्र रोमन सम्राट, १०८४–११०५

हेन्‍री पाचवा, पवित्र रोमन सम्राट, ११११–११२५

सप्लिंबर्गर घराणे

लोथर तिसरा, पवित्र रोमन सम्राट, ११३३–११३७

स्टौफेन (किंवा होहेंस्टौफ़ेन घराणे)

फ्रेड्रिक पहिला बार्बारोसा, ११५५–११९०

हेन्‍री सहावा, पवित्र रोमन सम्राट, ११९१–११९७

वेल्फचे घराणे

ब्रुंस्विकचा ऑट्टो चौथा, १२०९–१२१५ (d.१२१८)

स्टौफेन (किंवा होहेंस्टौफ़ेन घराणे)

फ्रेड्रिक दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १२२०–१२५०

लक्झेंबर्गचे घराणे

हेन्‍री सातवा, पवित्र रोमन सम्राट, १३१२–१३१३

विट्टेल्सबाखचे घराणे

लुइस चौथा द बव्हेरियन, १३२८–१३४७

लक्झेंबर्गचे घराणे

फ्रेड्रिक चौथा, पवित्र रोमन सम्राट, १३५५–१३७८

सिगिस्मुंड, पवित्र रोमन सम्राट, १४३३–१४३७

हॅब्सबर्गचे घराणे

फ्रेड्रिक तिसरा, १४५२–१४९३

मॅक्सिमिलियन पहिला, पवित्र रोमन सम्राट, १५०८–१५१९

फ्रेड्रिक पाचवा, पवित्र रोमन सम्राट, १५३०–१५५६

फर्डिनंड पहिला, पवित्र रोमन सम्राट, १५५६-१५६४

मॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १५६४–१५७६

रुडॉल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १५७६–१६१२

मॅथ्थियस, पवित्र रोमन सम्राट, १६१२–१६१९

फर्डिनंड दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १६१९–१६३७

फर्डिनंड तिसरा, पवित्र रोमन सम्राट, १६३७–१६५७

लिओपोल्ड पहिला, पवित्र रोमन सम्राट, १६५८–१७०५

जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट, १७०५–१७११

चार्ल्स सहावा, पवित्र रोमन सम्राट, १७११–१७४०

विट्टेल्सबाखचे घराणे

चार्ल्स सातवा आल्बर्ट, पवित्र रोमन सम्राट, १७४२–१७४५

हॅब्सबर्ग-लोरेनचे घराणे

फ्रॅंकिस पहिला, पवित्र रोमन सम्राट, १७४५–१७६५

जोसेफ दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १७६५–१७९०

लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १७९०–१७९२

फ्रॅंकिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १७९२–१८०६