Jump to content

चार्ल्स सहावा, पवित्र रोमन सम्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चार्ल्स सहावा

चार्ल्स सहावा (१ ऑक्टोबर १६८५, व्हियेना – २० ऑक्टोबर १७४०, व्हियेना) हा १७११ पासून मृत्यूपर्यंत हंगेरीचा राजा, बोहेमियाचा राजा, जर्मनीचा राजा, क्रोएशियाचा राजा, ऑस्ट्रियाचा आर्कड्युक व पवित्र रोमन सम्राट होता.

सम्राट लिओपोल्ड पहिला ह्याचा मुलगा असलेला सहावा चार्ल्स मोठा भाऊ जोसेफ पहिला ह्याच्या मृत्यूनंतर राज्यपदावर आला. सहाव्या चार्ल्सला तीन कन्या होत्या व पुत्र नव्हता. ह्यामुळे त्याने राज्यपदासाठी मोठी मुलगी मारिया तेरेसा हिची निवड केली होती व राजगादीवर एका स्त्रीची नियुक्ती व्हावी ह्यासाठी १७१३ साली एक ठराव मंजूर केला होता. परंतु चार्ल्सच्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्यामधील अनेक राजेशाह्यांनी तिचे नेतृत्व नाकारले व राजघराण्याच्या वारसपदासाठी ७ वर्षे चाललेले युद्ध झाले.

मागील
जोसेफ पहिला
पवित्र रोमन सम्राट
१७११-१७४०
पुढील
चार्ल्स सातवा