Jump to content

सवत माझी लाडकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सवत माझी लाडकी
दिग्दर्शन स्मिता तळवलकर
निर्मिती स्मिता तळवलकर
कथा सौ. मंदाकिनी गोगटे
पटकथा शं. ना. नवरे
प्रमुख कलाकार मोहन जोशी
नीना कुलकर्णी
वर्षा उसगांवकर
प्रशांत दामले
रमेश भाटकर
अमिता खोपकर
सुधीर जोशी
संवाद शं. ना. नवरे
छाया हरीष जोशी
संगीत अमर हळदीपूर
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ३० ऑगस्ट १९९३


सवत माझी लाडकी हा स्मिता तळवलकर दिग्दर्शित व निर्मितीत झालेला १९९३ साली प्रदर्शित झालेला विनोदी मराठी चित्रपट आहे. ह्यात मोहन जोशी, नीना कुलकर्णी, वर्षा उसगांवकर, प्रशांत दामले आणि रमेश भाटकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

कथानक

[संपादन]

पुरुषाला मोहाचा शाप तर स्त्रीला संयमाचा वर. युगानुयुगे चालत असलेली ही गोष्ट या विसाव्या शतकातल्या स्त्री-पुरुषाचा बाबत ही खरी ठरणारी. डॉ. मधुकर हिरवे (मोहन जोशी) आणि सीमा हिरवे (नीना कुलकर्णी) हे एक सुखी जोडपं. सीमा अत्यंत कर्तव्यदक्ष, चालक, सूज्ञ गृहिणी तर मधु नावाजलेला, हुषार डॉक्टर आणि त्याहीपेक्षा एक रसिक पुरुष. त्याचा सहकारी डॉ. दिनेश कीर्तिकर (प्रशांत दामले) अविवाहित आणि मिश्कील वृत्तीचा व मित्र प्रदीप भावे (रमेश भाटकर) हॉटेलवाला. डॉ. बीना कर्णिक (वर्षा उसगांवकर) नावाची एक सुंदर तरुणी मधुच्या हॉस्पिटलमध्ये त्याची असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात करते आणि मधुची रसिकवृत्ती जागी होते. प्रेमाच्या या शर्यतीत दिनेशही सामील होतो. बघता बघता मधुच्या प्रयत्नांना यश येतं आणि बीना त्याच्याकडे आकर्षित होते. नवऱ्याची प्रेमातील प्रगती जेव्हा सीमाला कळते तेव्हा त्या गृहिणीतली एक बुद्धिमान स्त्री जागी होते आणि ती एक भन्नाट प्रयोग करते. ती बीनाला सवत म्हणुन घरात तर आणतेच पण नवऱ्याला धडा शिकवता शिकवता सवतीलाही लाडकी करून टाकते. विसाव्या शतकातील ह्या गृहिणीचा हा अनोखा प्रयत्न चालू असताना मधुचा असा गैरसमज निर्माण होतो की सीमा व प्रदीप ह्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. मधु आणि सीमा पुन्हा एकत्र येतील का?

कलाकार

[संपादन]