रमेश भाटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
रमेश भाटकर
जन्म ३ ऑगस्ट १९४९
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ४ फेब्रुवारी २०१९
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके अश्रूंची झाली फुले
प्रमुख चित्रपट माहेरची साडी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम कमांडर, हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी, बंदिनी
पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार
वडील वासुदेव भाटकर
पत्नी मृदुला भाटकर
अपत्ये १ (हर्षवर्धन)

रमेश भाटकर (जन्म : ३ ऑगस्ट १९४९; मृत्यू : ४ फेब्रुवारी २०१९) हे एक नावाजलेले मराठी अभिनेते होते. गायक - संगीतकार स्नेहल भाटकर यांचे ते सुपुत्र होते. तीस वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी दूरदर्शन मालिका, रंगभूमी, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत विविधांगी अभिनय केला.

व्यक्तिमत्त्व[संपादन]

अतिशय उमद्या आणि खेळकर व्यक्तिमत्त्वाच्या [१] रमेश भाटकर ह्यांनी अभिनयासोबत जलतरणातही विशेष प्रावीण्य कमावले होते. तसेच ते उत्कृष्ट खो-खो पटू होते. [२] आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास तीसहून अधिक मालिकांमध्ये आणि ५०हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला.

९८व्या मराठी नाट्यसंमेलनामध्ये त्यांचा 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. [३]

रमेश भाटकर ह्यांच्या गाजलेल्या कलाकृती पुढीलप्रमाणे [४]

रमेश भाटकर यांचा गाजलेला अभिनय असलेल्या दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

 • कमांडर
 • दामिनी
 • बंदिनी
 • युगंधरा
 • हॅलो इन्स्पेक्टर

नाटके[संपादन]

 • अखेर तू येशीलच
 • अश्रूंची झाली फूले
 • केव्हा तरी पहाटे
 • मुक्ता
 • राहू केतू

चित्रपट[संपादन]

 • अष्टविनायक
 • आपली माणसं
 • चांदोबा चांदोबा भागलास का
 • दुनिया करी सलाम
 • माहेरची साडी


मृत्यू[संपादन]

ते कर्करोगाचे रुग्ण होते. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथे एलिझाबेथ रुग्णालयात त्यांची जीवनज्योत मालवली. त्यावेळी ते ७० वर्षांचे होते.

संदर्भ[संपादन]

 1. ^ नहीं रहे चर्चित मराठी अभिनेता रमेश भाटकर https://navbharattimes.indiatimes.com/movie-masti/news-from-bollywood/marathi-actor-ramesh-bhatkar-is-no-more/articleshow/67835121.cms
 2. ^ ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन http://www.saamana.com/veteran-actor-ramesh-bhatkar-passes-away/
 3. ^ रमेश भाटकर यांचे निधन https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/ramesh-bhatkar-passes-away/articleshow/67839660.cms
 4. ^ World Cancer Dayच्या दिवशीच रमेश भाटकर यांचे कर्करोगाने निधन https://www.loksatta.com/mumbai-news/marathi-actor-ramesh-bhatkar-passes-away-1835086/