तळोदे तालुका
?तळोदा महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | नंदुरबार |
भाषा | मराठी , आदिवासी भाषा |
संसदीय मतदारसंघ | नंदुरबार |
तहसील | तळोदा |
पंचायत समिती | तळोदा |
कोड • पिन कोड • दूरध्वनी |
• 425413 • +त्रुटि: "MH39" अयोग्य अंक आहे |
तळोदा महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील छोटे शहर आहे. हे शहर तळोदा तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
पार्श्वभूमी
[संपादन]तळोदा - उत्तरेकडे विस्तीर्ण सातपुडा पर्वताच्या रांगा तर दक्षिणेकडे तापी नदिचे विस्तारलेले पात्र यात वसलेले तळोदे हे शहर. तळोदे शहराला स्वतःचा सांस्कृतिक, सामाजिक असा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे तळोदे, पहेलवानकीने गाजणारे तळोदे अशी तळोद्याची पहेचान आहे. क्रीडा, कला, शिक्षण व राजकीय क्षेत्रात तळोद्याचा नाव लौकिक आहे. तळोदा तालुक्यात राहणाऱ्या लोकांना तळोदेकर म्हणून ओळखतात, तालुक्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. जहागीरदार बारगळांची गढी तळोद्यात बारगळांची गढी विशेष प्रसिद्ध आहे. सन १६६२ मध्ये जहागिरदार भोजराज बारगळ यांनी गढीचे बांधकाम केले. त्यासाठी सात ठिकाणाहुन माती आणण्यात आली. सलग पाच वर्षे बांधकाम सुरू होते. सहा एकर जागेत बारगळांची गढी वसलेली आहे. गढीचे प्रवेशद्वार पाहण्यासारखे आहे. त्यावरील कोरीव काम अप्रतिम असे आहे. आज ही गढी शेकडो वर्षानंतर ताठ मानेने उभी आहे. तळोदा गाव बारगळ जहागीरदारांना इनाम म्हणून प्राचीनकाळी मिळालेले. त्यामुळे या परिसरावर संस्थानिक बारगळ जहागीरदारांचे वर्चस्व. त्यामुळेच संस्थानिक राणा मानसिंग यानी शिवाजी बारगळ यांचे पुत्र भोजराज याना तळोदे हे गाव इनाम दिले. कालांतराने बारगळ व संस्थानिकात वाद निर्माण झाले. त्यांचे पर्यावसान युद्धात होऊन बारगळानी पूर्ण संस्थान काबिज केले. पुढे समजोता होऊन हे संस्थान परत करण्यात आले व लढाईच्या खर्च्याबद्दल बारगळाना तळोदा गावाची हद्द वाढवून मीळाली. राणानी बारगळाच्या पत्नीस बहिन मानले व या नात्याने दोन्ही घरातच कायमस्वरूपी स्नेहभाव निर्माण झाला. तळोदा शहरात श्रीमंत बारगळ जहागीरदारांची वैभावाची साक्ष असून प्राचीन गढ़ी आहे. या गढीचा काही भागाच्या आता पड़झड झाली असली तरी काही बांधकाम अजूनही शाबूत आहे. भोजराज बारगळ यानी १६६२ मधे या ऐतिहासिक वास्तुच्या बांधकामाला सुरुवात केली. पुढे त्यांचे पुत्र नारायणराव बारगळ यांनी गढीच्या कमानी दरवाजा बांधला. सुमारे सहा एकर परिसरात या ऐतिहासिक गढीचे बांधकाम झाले असुन हे बांधकाम पाच वर्ष चालले. बारगळ जहागीरदारांच्या घराण्यातील त्यांचे वंशज सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अमरजीतराव शिवाजीराव बारगळ व त्यांचे इतर आप्तेष्ट आजही या ऐतिहासिक गढीत राहतात. १९५२ पर्यंत तळोदयाचे प्रशासन हे बारगळ जहागीरदार यांच्या नियंत्रणाखाली चालायचे. जहागीरदार व गावाचे कामकाज चालवीण्यासाठी एक दिवाण सहा कारकून असायचे. त्यापैकी दोन कारकून हे त्यांच्या खाजगी कारभार पहायचे तर चार कारकून जहागीरदारीचे कामकाज, हिशेब, वसुलीचे काम पहायचे. शिवाय बाहेरच्या प्रशासकीय कामासाठी दोन पाटील होते. मुलकी पाटिल पोलीस पाटील ही दोन्ही पदे त्या वेळी होती. मुलकी पाटलाचे पाच वतनदार घराणे होते. मगन गनपत पाटील, गोविंद कडवा पाटील याप्रमाणे. प्रत्येक पाटीलला २७ एकर जमीन त्या वेळी उत्पनासाठी मीळायची. शिवाय ज़माबंदी दरबारात मुलकी पाटलाला ६९ रुपये १० आणे फेटा, पागोटे, उपरणे, पान-सुपारीचा मान मीळायचा. पोलीस पाटलाला वर्षाला ५७ रुपये ६ आणे फेटा पागोटे, उपरणे, वेताची काठी हां मान मीळायचा. याशिवाय १६ मील कामदार, वनदार (जागले), चार महार कामदार, एक कोळी कामदार वतनदार होते. या कामदारानाही त्यांचा कामापोटी वतन दिले जायचे. येथील हल्लीचे बारगळ जहागीरदार अमरजीतराव बारगळ यांचे पणजोबा कृष्णराव आनंदराव बारगळ आजोबा शंकरराव कृष्णराव बारगळ यांच्या पीढ़ीपर्यंत दि: १-८-१९५३ पर्यंतताळोद्यात ही प्रशासन यंत्रणा बारगळ जहागीरदारांकडे सुरू होती. त्यानंतर ताळोद्यात शासकीय कारभार इनाम ॲंबॉंक्युशन ॲंक्ट आला व शासनाकडे कारभार आला त्यानंतर तळोदयात शासकीय कारभार सुरू झाला. सन १८६७चा गॅंझेतेड रिपोर्ट व बारगळ जहागीरदार संस्थानचे जुने ऐतिहासिक दस्तावेज व कागदपत्राच्या नोंदीत या प्रशासकीय प्रणालीचा उल्लेख आहे.
गावे
[संपादन]- आळवण
- आमलेड
- अमळपाडा
- आमोणी
- आष्टेतर्फेबोराड
- बाण (तळोदा)
- बंधारे
- बेळीपाडा
- भावर
- बियामाळ
- बोराड
- बुधवळ
- बुधावळी (तळोदा)
- चौगाव बुद्रुक
- चौगाव खुर्द
- छोटाधानपूर
- चिनोडे
- दलेलपूर
- दासवड
- देकटी
धानोरे (तळोदा) धानपूर (तळोदा) एकधाड गाढावळी गौळणपाडा गोपाळपूर (तळोदा) गुंजाळी (तळोदा) हलालपूर इच्छागव्हाण जुवाणी कढेळ काकळपूर कलमसरे करडे (तळोदा) काझीपूरतळवाडी खरडी बुद्रुक (तळोदा) खरडी खुर्द (तळोदा) खारवड (तळोदा) खेडाळे (तळोदा) खुसगव्हाण कोठार कुंदावे लखापूर (तळोदा) लक्कडकोट लोभाणी माळखुर्द मालदे (तळोदा) मेंढवड मोड मोडळपाडा मोहिडा मोरवड नळगव्हाण (तळोदा) नर्मदानगर नवागाव (तळोदा) न्युबन पाडळपूर पाधाडी पिंपरपाडा प्रतापपूर (तळोदा) राजविरी रामपूर (तळोदा) राणापूर राणीपूर रांझणी (तळोदा) रापापूर रतनपाडा राझवेरेसेळे रेतपाडा रेवानगर रोझावे सालसडी सरदारनगर सातोणे सावर (तळोदा) सावरपाडा (तळोदा) सेलिंगपूर शेळवई शिरवे सिंगसपूर सोजारबारा सोमावळ बुद्रुक सोमावळ खुर्द सोरापाडा (तळोदा) तळोदे तळवे तऱ्हवड उमरकुवा (तळोदा) उमरी (तळोदा) वाल्हेरी झिरी
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नंदुरबार जिल्ह्यातील तालुके |
---|
अक्कलकुवा तालुका | अक्राणी तालुका | तळोदे तालुका | नंदुरबार तालुका | नवापूर तालुका | शहादा तालुका |