इटारसी जंक्शन रेल्वे स्थानक
Appearance
इटारसी भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | इटारसी, होशंगाबाद जिल्हा, मध्य प्रदेश |
गुणक | 22°36′29″N 77°46′0″E / 22.60806°N 77.76667°E |
मार्ग |
दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग |
फलाट | ८ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | ET |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम मध्य रेल्वे |
स्थान | |
|
इटारसी जंक्शन हे मध्य प्रदेशच्या इटारसी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेले इटारसी स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. येथे रोज ३०० पेक्षा अधिक गाड्या थांबतात. दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारतामधील सर्व राज्यांकडे धावणाऱ्या तसेच मुंबईकडून उत्तर प्रदेश व बिहारकडे धावणाऱ्या सर्व गाड्या इटारसीमार्गे जातात.