चर्चा:विंडोज लाइव्ह अलर्ट्स
हे पान ऑक्टोबर २०२२ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे. | ||
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती. |
विशेषनाम लेख
[संपादन]येथे विशेषनामांनी असलेल्या लेखांच्या शीर्षकांचे भाषांतर करू नये.
पुन्हा एकदा, पुन्हा एकदा तुम्ही कोणालाही न विचारता करता लेखांची हलवाहलव सुरू केलेली आहे. काय केल्याने तुम्ही इतरांचे मत घ्याल?
तुम्ही येथे करीत असलेल्या योगदानाची आम्हा सर्वांना कदर आहे परंतु अनेकदा हा जो उपद्रव होतो तो कृपया टाळावा ही अतिआग्रहाची विनंती.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ११:३४, १२ ऑक्टोबर २०२२ (IST)
cc:@Tiven2240:, @संतोष गोरे:, @Usernamekiran: अभय नातू (चर्चा) ११:३४, १२ ऑक्टोबर २०२२ (IST)
ता.क. भाषांतरित शीर्षकापासून मूळ नावाकडे पुनर्निर्देशन घालणे हे बरोबर आहे परंतु लेख सरसकट हलवू नयेत.
@अभय नातू: असे अनेक लेख आहेत ज्यात विशेष नामांची मराठीत भाषांतर करुन लेख शीर्षक लिहिलेले आहेत. उदा. विंडोज लाइव्ह सदन आणि अजून बरेच जे मी स्वतः केलेली नाहीत. यावरुन असे वाटते की मराठी शीर्षके योग्य असावीत. यावर तुमचे मत कळवावे, विनंती. Khirid Harshad (चर्चा) ११:३८, १२ ऑक्टोबर २०२२ (IST)
- @Khirid Harshad:,
- लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. माझे मत मी वर मांडलेले आहेच.
- माझा अधिक रोख तुम्ही अशा एकठोक बदल करण्याआधी कोणाशीही मसलत करीत नाही याकडे आहे.
- तुम्हाला साद घातल्यावर लगेचच उत्तर देता आणि सामंजस्याने पुढील पावले उचलता हे मी नमूद करतो परंतु अशा बदलांकडे नेहमीच कोणाचे तरी लक्ष असून त्यांनी तुम्हाला हटकणे शक्य नाही. तुम्हाला असे मोठ्या प्रमाणात करावयाचे बदल सुचले तर कृपया विकिपीडिया:मदतकेंद्र येथे एक संदेश घालावा किंवा येथील चार प्रचालकांना थेट साद घालावी.
- तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ११:४१, १२ ऑक्टोबर २०२२ (IST)
@अभय नातू: क्षमस्व, आतापासून मी ही सवय लावून घेण्याचा नक्की प्रयत्न करीन. परंतु आता अशा विशेषनाम लेखांच्या शीर्षकावरचा उपाय काय? Khirid Harshad (चर्चा) ११:४३, १२ ऑक्टोबर २०२२ (IST)
- विशेषनामांनी असलेल्या लेखांच्या शीर्षकांचे भाषांतर करू नये. याला अपवाद असू शकतात, विशेषतः मराठीत प्रचलित नावांना, परंतु हे सुद्धा अपवादात्मक असावे -- अमेरिकेची संयुक्त संस्थाने वि. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्याचवेळी नॉर्थ डकोटाचे उत्तर डकोटा करू नये.
- मराठी भाषांतरित शीर्षकापासून मूळ लेखाकडे पुनर्निर्देशन असावे.
- ज्या शीर्षकांबद्दल खात्री नसेल अशा लेखांच्या चर्चा पानावर संदेश घालावा.
- अभय नातू (चर्चा) ११:४६, १२ ऑक्टोबर २०२२ (IST)
- सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, "Apple" फळाचा लेख "सफरचंद" नावानी योग्य आहे. पण "Apple" कंपनीचा लेख "ॲपल" नावाने योग्य आहे. फक्त विकिपेडियावरच नाही, तर इतर ठिकाणीही विशेष नामाचे शक्यतो भाषांतर टाळत असतात.
- जेव्हा नवीन लेख तयार करण्यात येतात किंवा भाषांतरित करण्यात येतात, तेव्हा त्यांचे निष्णांतपणे नामकरण होत नाही. पण केवळ जुने आहे म्हणून बरोबर आहे, असे नसते. विरोधाभास आढळल्यास चूक बरोबर करणे हे चांगले आहे, पण बदल भरपूर असतील किंवा योग्यत्वाबद्दल शंका असेल तर चावडीवर इतर संपादकांचे मत जाणून घेणे जास्त चांगले आहे. —usernamekiran (talk) २१:०८, १२ ऑक्टोबर २०२२ (IST)