आर्जेन्टाइन समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्जेन्टिनाच्या नकाशावर आर्जेन्टिनी समुद्र

आर्जेन्टिनी समुद्र हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्याजवळील अटलांटिक महासागराचा एक उप-समुद्र आहे. आर्जेन्टिना देशाच्या आग्नेयेस स्थित असलेल्या ह्या समुद्राची साधारण सीमा उरुग्वेच्या मोन्तेविदेओ शहरापासून दक्षिण आर्जेन्टिनाच्या तिएरा देल फ्वेगो पर्यंत असून तो अंटार्क्टिका खंडाच्या सुमारे ८०० किमी उत्तरेस आहे. फॉकलंड द्वीपसमूह ह्याच समुद्रात स्थित आहे.