२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता
२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता ही २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेचा भाग म्हणून खेळवली जाणारी एक स्पर्धा होती.
एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने १ जानेवारी २०१९ पासून सदस्य संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या ट्वेंटी२० सामन्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. त्यायोगे या प्रादेशिक पात्रता फेरीतील सर्व सामने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० म्हणून खेळवले जाणार होते. सदर स्पर्धा ही ११ ते १६ ऑक्टोबर २०२१ दरम्यान जपान येथे होणार होती. स्पर्धेतील विजेता संघ दोनपैकी एका जागतिक पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरणार होता. परंतु कोव्हिड-१९च्या संक्रमणामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यामुळे पूर्व-आशिया प्रशांत क्षेत्रामधून सर्वोच्च असलेला फिलिपाईन्स क्रिकेट संघ हा २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ करता पात्र ठरला.
प्रादेशिक अंतिम फेरी
[संपादन]२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना | ||
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने | ||
यजमान | जपान | ||
सहभाग | ८ | ||
|
सहभागी देश
[संपादन]सदर देश सहभाग घेणार होते: