Jump to content

बांगलादेशचे विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांग्लादेशचे विभाग

बांगलादेशचे विभाग (बांग्ला: বাংলাদেশের বিভাগ) हे बांगलादेश देशाचे ८ राजकीय विभाग आहेत. प्रत्येक विभागाचे नाव त्या भागातील प्रमुख शहरावरून घेण्यात आले असून ते शहर त्या विभागाचे मुख्यालय आहे. प्रत्येक विभाग अनेक जिल्ह्यांमध्ये विभागला गेला असून जिल्हे उपजिल्ह्यांमध्ये विभागण्यात आले आहेत.१९७१ सालच्या बांग्लादेशच्या निर्मितीनंतर बांग्लादेश ४ विभागांमध्ये वाटला गेला होता, त्यानंतर आजवर ४ नवे विभाग बनवण्यात आले.

संपूर्ण यादी

[संपादन]
विभाग मुख्यालय स्थापना उपविभाग क्षेत्रफळ (km2)[] लोकसंख्या (2011)[] घनता (people/
km2) (2011)[]
जिल्हे उपजिल्हे ग्रामीण परिषदा
खुलना विभाग खुलना इ.स. 1960 10 59 270 22,284.22 1,56,87,759 699
चट्टग्राम विभाग चट्टग्राम इ.स. 1829 11 101 949 33,908.55 2,91,45,000 831
ढाका विभाग ढाका इ.स. 1829 13 123 1,248 20,593.74 3,64,33,505 1,751
बारिसाल विभाग बारिसाल इ.स. 1993 6 39 333 13,225.20 83,25,666 613
मयमनसिंह विभाग मयमनसिंह इ.स. 2015 4 34 350 10,584.06 1,13,70,000 1,074
रंगपूर विभाग रंगपूर इ.स. 2010 8 58 536 16,184.99 1,57,87,758 960
राजशाही विभाग राजशाही इ.स. 1829 8 70 558 18,153.08 1,84,85,858 1,007
सिलहट विभाग सिलहट इ.स. 1995 4 38 334 12,635.22 98,07,000 779
एकूण ८ ढाका 64 522 4,576 1,47,610.00 14,69,68,041 1,106

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "2011 Population & Housing Census: Preliminary Results" (PDF). Bangladesh Bureau of Statistics. 15 January 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 12 January 2012 रोजी पाहिले.