काम (धर्म)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काम
प्रेम, भावना, लैंगिक इच्छा आणि आनंद.
खजुराहो येथील काम शैलीचे चित्रण
कामदेवता ज्याचे बाण काम इच्छा उत्तेजित करतात
प्रेम, स्त्री आणि पुरुष यंत्र
कला, निसर्गातून सौंदर्याचा आनंद[३]
भारतातील कामुक चित्र
हिंंदु धर्मामध्ये कामाचे अनेक संदर्भ दिलेले आहेत,[१] परंतु हे मानवातील सहा दोषांपैकी एक म्हणून देखील चित्रित केले आहे.[२].

काम हे हिंदू धर्मात दिलेल्या चार पुरुषार्थांपैकी एक आहे. इतर तीन अर्थ, धर्म आणि मोक्ष आहेत. यांना मानवाच्या शोधातील मनुष्याचे मुख्य उद्दिष्ट समजले जाते. याचा शब्दशः अर्थ आनंद, परमसुख असा होतो. प्रामुख्याने काम म्हणजे आनंद किंवा कामुक्ता असे समजले जाते. पण हे यापेक्षाही अधिक आहे, यामध्ये कला,संगीत, प्रेम आणि अंतरंगाचा समावेश होतो. हिंदू धर्मानुसार पूर्ण जीवनाचा काम ही एक महत्त्वपूर्ण अंग आहे. काम ही मनुष्याच्या अंतरंगात होणारी एक इच्छा आहे जी प्राप्त करण्यासाठी तो उत्सुक असतो आणि त्यानुसार आपले कर्म देखील करतो आणि हीच इच्छा मनुष्याच्या जीवन उद्देशांसोबत जोडली जाते. काम ही एक अशी भावना आहे ज्यामध्ये मनुष्य आनंदाच्या शोधात असतो त्याबद्दल तो बरेच काही शिकतो, त्याच्या भावना सुद्धा त्या सोबत जोडल्या जातात. ही एक आनंदाची प्रक्रिया असून अनुभवा आधी दरम्यान व नंतर असणारी एक कल्याणकारी भावना आहे आणि यामध्ये जे काही आपण आपल्या इंद्रिया मार्फत अनुभवतो त्यामध्ये पूर्णपणे उपस्थित असणे हे होय. याचा उद्देश आपल्या इच्छापूर्तीसाठी असतो यामधून आपल्याला समाधान व संतुष्टी प्राप्त होते. या पासून समाधान मिळणे हे मनुष्याचे उद्दिष्ट असले पाहिजे नाकी त्यामध्ये फसून त्याला सर्वस्व बनवणे नाही. काम हा मनुष्याला मनुष्याला व्यक्ती जीवनामध्ये आनंद सुख शांती मिळवण्याचा एक यज्ञ आहे. कामाबद्दल वात्स्यायन यांच्या कामसूत्र या ग्रंथामध्ये विस्तारपणे लिहिले आहे. परंतु त्याला एक लैंगिक सुखासाठीचे मार्गदर्शक पुस्तक असे समजले जाते, परंतु यामध्ये पवित्र, शालिन जीवनाचे मार्गदर्शन आहे यामध्ये प्राकृतिक प्रेम, पारिवारिक जीवन आणि मानवी जीवनाच्या आनंददायक कार्याचे वर्णन केले आहे हे पुस्तक काम देव किंवा रतिला समर्पित नसून ते विद्येच्या देवी सरस्वतीला समर्पित केलेले आहे

हिंदु साहित्यामध्ये[संपादन]

काम ही संकल्पना वेदातील काही प्राचीन श्लोकांमध्ये आढळते. उदाहरणार्थ, ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात प्रचंड उष्णतेने विश्वाच्या निर्मितीचे वर्णन केले आहे. सुक्त १२९ मध्ये ४ श्लोकात असे म्हटले आहे: (ऋग्वेद- 10.129.4 )

 कामस्तदग्रे समवर्तताधि मनसो रेतः परथमं यदासीत |
 सतो बन्धुमसति निरविन्दन हर्दि परतीष्याकवयो मनीषा ||

सृष्टीची इच्छा प्रथम भगवंताच्या मनात निर्माण झाली. तीच पहिली गोष्ट होती जी मनात विश्वाचे बीज रुजली. विद्वानांनी बुद्धीने विचार केला आणि असत् मधून सत् जाणुन घेतले.

ब्रहदारण्यक उपनिषद, हिंदू धर्मातील सर्वात जुन्या उपनिषदांपैकी एक, कोणत्याही इच्छेचा संदर्भ देण्यासाठी काम हा शब्द वापरतो:

 मनुष्यामध्ये इच्छा (काम) असते,
 जशी त्याची इच्छा, तसाच त्याचा निर्धार,
 जसा त्याचा निश्चय आहे, तसे त्याचे कृत्य आहे.
 त्याचे कृत्य जे काही असेल ते त्याला प्राप्त होते.

वात्स्यायनाचा दावा आहे की कामाचा कधीही धर्म किंवा अर्थ यांच्याशी संघर्ष होत नाही, उलट तिन्ही एकत्र राहतात आणि काम इतर दोन मधून प्रकट होतो.कामसूत्रातील वात्स्यायन खालीलप्रमाणे तीन उद्दिष्टांचे सापेक्ष मूल्य ओळखतो: अर्थ कामाच्या आधी आहे, तर धर्म काम आणि अर्थ या दोन्हीच्या आधी आहे.

 धर्म, अर्थ आणि कामाचे पालन करणारा मनुष्य आता आणि भविष्यात सुखाचा आनंद घेतो. 
 धर्म, अर्थ आणि काम यांचे एकत्र आचरण करण्यास प्रवृत्त करणारी कोणतीही कृती किंवा कोणत्याही दोनपैकी किंवा त्यापैकी एकही केली पाहिजे. 
 परंतु उरलेल्या दोनच्या खर्चाने त्यापैकी एकाचा सराव करण्यास प्रवृत्त करणारी कृती करू नये.

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू (सहा शत्रू) असे म्हटले आहे. भगवद्गीतेत भगवान कृष्ण म्हणतात

 श्री भगवानुवाच
 काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः।
 महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्।।३.३७।।

श्रीभगवान् म्हणतात रजोगुणामुळे उत्पन्न झालेली कामना हीच क्रोध आहे. ही महाशना (ज्याची भूक मोठी आहे) आणि महापापी आहे. यालाच तुम्ही इथे (या जगात) शत्रू माना.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Zysk, Kenneth (2018). "Kāma". In Basu, Helene; Jacobsen, Knut A.; Malinar, Angelika; Narayanan, Vasudha (eds.). Brill's Encyclopedia of Hinduism. 7. Leiden: Brill Publishers. doi:10.1163/2212-5019_BEH_COM_2050220. ISBN 978-90-04-17641-6. ISSN 2212-5019.
  2. ^ James Lochtefeld (2002), The Illustrated Encyclopedia of Hinduism, Volume 1, Rosen Publishing, New York, आयएसबीएन 0-8239-2287-1, page 340.
  3. ^ See: