दानिल मेदवेदेव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दानिल मेदवेदेव्ह
Дании́л Медве́дев (रशियन)

२०१९ मायामी ओपनदरम्यान
देश रशिया ध्वज रशिया
वास्तव्य मोनॅको
जन्म ११ फेब्रुवारी, १९९६ (1996-02-11) (वय: २८)
मॉस्को, रशिया
उंची १.९८ मी (६ फु ६ इं)
सुरुवात इ.स. २०१४
शैली उजव्या हाताने; बॅकहॅंड दोन्ही हातांनी
बक्षिस मिळकत १९ दशलक्ष अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन २०६ - ९६
अजिंक्यपदे १३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २ (१५ मार्च २०२१)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. २ (१४ जून २०२१)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (२०२१, २०२२)
फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०२१)
विंबल्डन चौथी फेरी (२०२१)
यू.एस. ओपन विजयी (२०२१)
इतर स्पर्धा
टूर फायनल्स
दुहेरी
प्रदर्शन १३ - २०
शेवटचा बदल: सप्टेंबर २०२१.


दानिल मेदवेदेव्ह (रशियन: Дании́л Серге́евич Медве́дев, ११ फेब्रुवारी १९९६) हा एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. एटीपी जागतिक एकेरी खेळाडूंच्या क्रमवारीत मेदवेदेव्ह सध्या नोव्हाक जोकोविच खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर १३ एकेरी स्पर्धा जिंकल्या असून २०२१ यू.एस. ओपन स्पर्धेमध्ये विजय मिळवून त्याने आपली पहिलीवाहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली. ह्यापूर्वी दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी त्याने गाठली होती.

२०१५ मध्ये वायसायिक टेनिस खेळण्यास सुरुवात केलेल्या मेदवेदेव्हने २०१६ विंबल्डन स्पर्धमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्तानिस्लास वावरिंकाला पराभूत करून टेनिस जगताचे लक्ष वेधून घेतले होते. तेव्हापासून मेदवेदेव्हने अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवला असून तो आजच्या घडीला पुरुष टेनिसमधील आघाडीचा खेळाडू मानला जातो.

कारकीर्द[संपादन]

ग्रॅंड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या: ३ (१ - २)[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेता २०१९ यू.एस. ओपन हार्ड स्पेन रफायेल नदाल ५-७, ३-६, ७-५, ६-४, ४-६
उप-विजेता २०२१ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच ५-७, २-६, २-६
विजेता २०२१ यू.एस. ओपन हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच ६-४, ६-४, ६-४
उप-विजेता २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड स्पेन रफायेल नदाल ६-२, ७-६, ४-६, ४-६, ५-७

बाह्य दुवे[संपादन]

  • "दानिल मेदवेदेव्ह" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)