डाळिंब (दौंड)
?डाळिंब महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दौंड |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
डाळिंब हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]परिसराचे नाव : डाळींब (डाळिंब)
तालुक्याचे नाव : दौंड
जिल्हा : पुणे
राज्य: महाराष्ट्र
प्रदेश : देश किंवा पश्चिम महाराष्ट्र
विभाग : पुणे
भाषा: मराठी
वेळ क्षेत्र: IST (UTC+5:30)
विधानसभा मतदारसंघ : दौंड विधानसभा मतदारसंघ
लोकसभा मतदारसंघ : बारामती लोकसभा मतदारसंघ
पिन कोड : 412202
पोस्ट ऑफिसचे नाव : उरुळीकांचन
हवामान
[संपादन]येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन-
[संपादन]२०११ च्या जनगणनेनुसार डाळींब गावाचा स्थान कोड किंवा गाव कोड ५५६३५९ आहे. डाळींब हे गाव महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आहे. हे उपजिल्हा मुख्यालय दौंड (तहसीलदार कार्यालय) पासून 65 किमी अंतरावर आणि पुणे जिल्हा मुख्यालयापासून 30 किमी अंतरावर आहे. 2009 च्या आकडेवारीनुसार, डाळींब गाव देखील ग्रामपंचायत आहे.
गावाचे क्षेत्रफळ सुमारे १२२४ हेक्टर अाहे. डाळींबची एकूण लोकसंख्या 2,724 लोकसंख्या आहे, त्यापैकी पुरुषांची लोकसंख्या 1,410 आहे तर महिलांची लोकसंख्या 1,314 आहे. डाळींब गावाचा साक्षरता दर ६८.४३% असून त्यापैकी ७४.८९% पुरुष आणि ६१.४९% महिला साक्षर आहेत. डाळींब गावात सुमारे ५३९ घरे आहेत. डाळींब गावाचा पिन कोड 412202 हा आहे.
प्रेक्षणीय स्थळे- श्री विठ्ठल मंदिर बन (प्रति पंढरपूर) ,
[संपादन]डाळिंब हे एक पवित्र स्थान आहे तिथे एक उत्साही आणि आश्वासक विठ्ठल मंदिर आहे. दौंड तालुक्यातील मौजे डाळिंब बन तालुका दौंड जिल्हा पुणे येथील श्री विठ्ठल देवस्थान हे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे , पुरंदर तालुका, हवेली तालुका आणि दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात असुन, तिन्ही तालुक्याच्या मध्ये सीमेवर वसले आहे, त्यामुळे या प्रति पंढरपूर तीर्थस्थळी, आषाढी एकादशीला दरवर्षी प्रमाणे देवस्थान समितीच्या वतीने श्री विठ्ठल मंदिर व परिसरात भव्य मंडप उभारून आकर्षित विद्युत रोषणाईने उजळून सजावट केली जाते, आषाढी एकादशी निमित्त पुणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे भाविक भक्त मोठ्या संख्येने या प्रति पंढरपूर मौजे डाळिंब बन येथिल श्री विठ्ठलाचे देवदर्शनासाठी येत असतात, मौजे डाळिंब गाव ते श्री विठ्ठल मंदिर बन, श्रींची पालखी मिरवणूक दुपारी आयोजित करण्यात येते विविध गावातील सांप्रदायिक भजनी मंडळे उपस्थित राहून भजन माला आयोजित करण्यात येते .मौजे डाळिंब विठ्ठल मंदिर बन येथे पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे प्रसिद्ध ढोल ताशा पथकांचा जंगी प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येते
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल बन येथे पुरंदर तालुका हवेली तालुका आणि दौंड तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे भाविक नागरिक मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी येत असतात, या ठिकाणी भाविक भक्तांसाठी साक्षात पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीचे दर्शन घडते, स्वयंभू माझा विटेवरी उभा, कैवल्याचा गाभा पांडुरंग पाहण्यासाठी भाविक धाव घेत असल्याने, अवघे गर्जे डाळिंब बन प्रति पंढरपूर अशी संकल्पना केली तरी वावगे ठरणार नाही, डाळिंब गावातील समस्त ग्रामस्थ युवा तरुण मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होऊन विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवतात
नागरी सुविधा-
[संपादन]रिक्षा,बस
नाम आणखी २शब्दकोश पहा ३ / ५,०००
भाषांतर परिणाम
[संपादन]भाषांतर परिणाम
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]बोरीभडक (४ किमी), राजेवाडी (६ किमी), टेकवडी (६ किमी), उरुळीकांचन (६ किमी), सहजपूर (७ किमी) ही डाळींबच्या जवळची गावे आहेत. डाळिंब पश्चिमेला हवेली तालुका, पूर्वेला दौंड तालुका, पश्चिमेला पुणे तालुका, उत्तरेकडे शिरूर तालुक्याने वेढलेला आहे