Jump to content

पेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?पेड

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर तासगांव
जिल्हा सांगली जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

पेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. पूर्वी औरंगजेब बादशहा खानापूर जवळून जात असताना 'यहा बहुत पेड़ हैं' असा उल्लेख केला होता व त्यावरून या गावाला 'पेड' हे नाव मिळाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

▪︎ पेडचा तलाव (उंबर दरा) ▪︎ तलावाजवळील अम्युजमेंट पार्क (उंबर दरा) ▪︎ पुरातन वाडे व बुरुज ▪︎ श्री सिद्धनाथ मंदिर (ग्रामपंचायती शेजारी) ▪︎ हनुमान मंदिर (बस स्टॅण्ड जवळ) ▪︎ विठ्ठल मंदिर (चांभारवाडा व बाहेरच्या वाड्याजवळ) ▪︎ विठ्ठल मंदिर (मठ) (कापूर ओढ्याजवळ) ▪︎ भवानी देवी मंदिर (भवानी माळ) ▪︎ गावाभोवतालच्या डोंगररांगा व गर्द झाडी ▪︎ बिरोबा मंदिर (बिरोबानगर) ▪︎ श्री शंकराचे मंदिर (बजाबाचा वाडा) ▪︎ पेडचा घाट ▪︎ पुरातन विरगळी (श्री सिद्धनाथ मंदिराजवळ)

गावाची वैशिष्ट्ये

[संपादन]

पूर्वीचे लोकं असे सांगतात, की पेड या गावामध्ये पूर्वी खुप झाडे होती त्यामुळे या गावाला 'पेड' हे नाव मिळाले आहे. हे गाव डोंगरांमध्ये वसलेले आहे. या गावात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. येथे विविध मंदिरे आहेत जसे ; श्री सिद्धनाथ मंदिर, हनुमान मंदिर, श्री शंकराची पिंड, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मठ, यल्लामा देवी मंदिर, देवी म्हाकुबाई मंदिर, देवी भवानी माता मंदिर, श्री बिरोबा मंदिर इ. पेड गावाभोवती विविध वाडी-वस्त्या आहेत जसे ; काळा मळा, जगदनी मळा, पडका मळा, वाण्याचा मळा, पिरदरा, पाचेखोरा, विठ्ठलनगर (डुक्करदरा), उंबरदरा, कुंभार वस्ती, सोनारबारी, मुलानी वस्ती, गुरव वस्ती, कोकरे वस्ती, बिब्ब्याचं शेत, बिरोबाचे तळ, मंगीरी, नरसेवाडी, धोंडेवाडी, हजारवाडी, मोराळे, विजयनगर, भालेखडा इ. पेड गावामध्ये विविध समाजेचे लोग राहतात. येथे धनगर समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. तसेच बारा-बलुतेदार सुद्धा येथे वास्तव्यास आहेत. या गावात पूर्वीचे वाडे सुद्धा बघायला मिळतात जसे ; बाहेरचा वाडा, मधला वाडा, बजापाचा वाडा इ. पेडमध्ये शैक्षणिक व्यवस्था चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. येथे अंगणवाड्या, जि.प. शाळा आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय [12वी पर्यंत (कला व विज्ञान शाखा)] आहेत. पेडमध्ये दर रविवारी आठवडे बाजार भरतो. गावात सरकारी दवाखाना व्यायामशाळा व वाचानालय आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate