ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७५-७६
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७५-७६ | |||||
वेस्ट इंडीज महिला | ऑस्ट्रेलिया महिला | ||||
तारीख | ७ – १६ मे १९७६ | ||||
संघनायक | लुसी ब्राउन | ॲनी गॉर्डन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने मे १९७६ मध्ये दोन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.
१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकमध्ये वेस्ट इंडीजचा असा सामुदायिक संघ नव्हता. त्यावेळी जमैका आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांच्या महिला क्रिकेट संघांनी स्वतंत्रपणे सहभाग घेतला होता. १९७३ च्या विश्वचषकानंतर इसवी सन १९७५ मध्ये वेस्ट इंडीजच्या महिला संघाची स्थापना करण्यात आली. त्रिनिदादच्या लुसी ब्राउनकडे संयुक्त वेस्ट इंडीज महिला संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले. संघाचे गठन झाल्यावर ऑस्ट्रेलियन महिला संघ आपल्या वहिल्या करैबियन दौऱ्यसाठी जमैकात दाखल झाला. ७ मे १९७६ रोजी वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला कसोटी पदार्पण करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. दोन्ही कसोटी अनिर्णित राहिल्याने २ सामन्यांची महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
महिला कसोटी मालिका
[संपादन]१ली महिला कसोटी
[संपादन]७-९ मे १९७६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
- वेस्ट इंडीज महिलांचा पहिला महिला कसोटी सामना.
- वेस्ट इंडीज महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला या दोन्ही देशांमधला पहिला महिला कसोटी सामना.
- करैबियन भूमीवर ऑस्ट्रेलिया महिलांनी पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला.
- शेरील बेली, बेव्हर्ली ब्राउन, लुसी ब्राउन, पेगी फेयरवेदर, ग्लोरिया गिल, विव्हालिन लॅटी-स्कॉट, जॅनेट मिचेल, जॅस्मिन सॅमी, मेनोटा टेकाह, पॅट्रिसिया व्हिटटेकर, ग्रेस विल्यम्स (वे.इं.), जॅनेट ट्रेड्रिया, वेंडी हिल्स, जॅन लंब्सडेन आणि मारी कॉर्निश (ऑ) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
२री महिला कसोटी
[संपादन]१४-१६ मे १९७६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
- योलांड गेडेस-हॉल आणि नोरा सेंट रोझ (वे.इं.) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.