धूळपाटी/मराठी साहित्यातील अजरामर काव्यपंक्ती आणि सूक्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी साहित्यात अनेक अजरामर काव्यपंक्तींची आणि सूक्तींची उधळण झालेली दिसते. अश्या काव्यपंक्ती किंवा त्याचे अंश, लेखांचे-विशेषतःअग्रलेखांचे मथळे, पुस्तकांची शीर्षके, नाटक-चित्रपटांची-कार्यक्रमांची नावे यांसाठी उपयोगात येतातच पण त्याशिवाय गप्पांच्या ओघात किंवा व्याख्यानाच्या-प्रवचनांच्या वाक्प्रवाहांत मुक्तहस्ते वापरली जातात.

अश्या काव्यपंक्तींचा आणि सूक्तींचा हा संग्रह :

  • अनाथ मी अपराधी ... 'धांव पाव रे सांवळे विठाई'ने सुरू होणाऱ्या गीतातील ओळ. मूळ गाणे 'छोटा जवान' या चित्रपटात आशा भोसले यांनी गायले आहे. गीतकार - ग.दि. माडगुळकर; संगीतकार - वसंत देसाई.
  • असून खास मालक घरचा, चोर म्हणती त्याला ... संगीत रणदुंदुभि'तील नाट्यगीत; कवी - वीर वामनराव जोशी; संगीतकार वझेबुवा; गायक - दीनानाथ मंगेशकर; राग - पिलू.
  • अन्नासाठीं दाही दिशा, आम्हां फिरविसी जगदीशा ... व्यंकटेशस्तोत्र २२.
  • आतां रक्षण नाना उपायीं, करणें तुज उचित ... व्यंकटेशस्तोत्र १६.
  • आधीच मर्कट ... पारंपरिक कविता - आधीच मर्कट, तशांतही मद्य प्याला, झाला तशांतही वृश्चिकदंश त्याला; झाली तयास तद्नंतर भूतबाधा, चेष्टा वदूं मग किती कपिच्या अगाधा ॥. संकृतमध्ये - मर्कटस्य सुरापानम् । तत्र वृश्चिकदंशनम् । तन्मध्ये भूतसंचारो । यद्वा तद्वा भविष्यति॥
  • उडदांमाजीं काळें गोरें, काय निवडावें निवडणारें ... व्यंकटेशस्तोत्र १४.
  • उदकाचिया आर्ती ... ज्ञानेश्वरी अध्याय ११वा, ओवी ५३वी. पूर्ण ओवी - देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती । होतों उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत ॥ ५३ ॥. मिलिंद बोकील यांचे याच नावाचे एक पुस्तक आहे.
  • एकवार पंखावरूनि फिरो तुझा हात ... 'वरदक्षिणा' चित्रपटातल्या गीताची ओळ, कवी - ग.दि. माडगुळकर, गायक - सुधीर फडके; संगीतकार - वसंत पवार.
  • ऐसा विटेवरी देव कोठे ... ज्ञानेश्वरी अध्याय ?
  • कठिण समय येता कोण कामास येतो ... रघुनाथ पंडिताचे नलदमयंती स्वयंवर आख्यान ४५.
  • कबिराचे विणीतो शेले ...
  • कलंक मतिचा झडो ... मोरोपंतांची केकावली
  • कशासाठी पोटासाथ ... बालगीत, कवी - माधव ज्युलियन.
  • कुचलिया वृक्षाचीं फळें, मधुर कोठोन असतील ... व्यंकटेशस्तोत्र १४.
  • कुबेर तुझा भांडारी, आम्हां फिरविसी दारोदारीं ... व्यंकटेशस्तोत्र १९.
  • कृतान्तकटकामलध्वजज़रा ... मोरोपंतांची केकावली ४६.
  • कृपाळुवा जगजेठी, अपराध पोटीं घालीं माझे ... व्यंकटेशस्तोत्र ११.
  • कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें ... 'सामना' चित्रपटातील गीत; कवी - आरती प्रभू; गायक रवींद्र साठे, संगीतकार - भास्कर चंदावरकर.
  • केल्याने होत आहे रे आधीं केलेंच पाहिजें ... रामदासस्वामीकृत दासबोध समास-अध्याय-ओवी?
  • कोण तुजसम संग मज गुरूराया, कैवारी सदया ... 'संगीत सौभद्र'मधील नाट्यगीत, कवी व संगीतकार - अण्णासाहेब किर्लोस्कर; गायक - छोटा गंधर्व; राग मिश्रपिलू.
  • गड आला पण सिंह गेला ...ह.ना. आपटे यांच्या कादंबरीतील शिवाजीच्या तोंडचे उद्गार.
  • गर्जा जयजयकार क्रांतिचा ... कुसुमाग्रज
  • गोट्याला शेंदूर । फासून तेलात। बसती देवात । दगड तो ॥ धोंडे मुले देती । नवसा पावती । लग्न का करती । नारी-नर ॥ - सावित्रीबाई फुले
  • जगी सर्वसूखी असा कोण आहे? ... रामदासस्वामीकृत मनाचे श्लोक ११.
  • जनांचा प्रवाहों चालिला (म्हणजे कार्यभाग आटोपला। जन ठायी ठायी तुंबला। म्हाणिजे खोटे ... रामदास स्वामींनी संभाजीराजांना लिहिलेल्या काव्यमय पत्रातल्या ५व्या कडव्याची पहिली ओळ)
  • जया (ज्याचे) अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ... तुकारामाची गाथा, अभंग क्रमांक ?
  • जिंकू किंवा मरू ... वसंत बापट
  • जें जें आपणास पाहिजें । तें तें कल्पून वाहिजे । ... दासबोध ०४/०५/३३.
  • जो जें वांच्छील तो तें लाहो ... ज्ञानेश्वरांचे पसायदान ३.
  • टवाळासि आवडे विनोद ... रामदासस्वामीकृत दासबोध, दशक सातवे, ओवी ५१.
  • तो गुरू, तो गुरूनंदन, तो कृप, तो कर्ण, तो पितामह, रे ... मोरोपंतकृत आर्याभारत-विराटपर्व-अध्याय ४था, आर्या ७७.
  • दुरिताचें तिमिर जावो ... ज्ञानेश्वरांचे पसायदान ३.
  • द्रौपदीसी वस्त्रें अनंता, देत होतासी भाग्यवंता, आम्हांलागीं कृपणता, कोठोनि आणली गोविंदा ...व्यंकटेशस्तोत्र २०.
  • धांव धांव रे गोविंदा, हाती घेवोनिया गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा ...व्यंकटेशस्तोत्र ३७.
  • न मिळे अशी मौज पुन्हां पाहण्या नरां ...'संगीत शौभद्र'मधील 'लग्नाला जातों मी' या पदातली एक ओळ.
  • नाटक झालें जन्माचें ...संगीत शारदातले नाट्यगीत. - अजून खुळा हा नाद पुरेसा कैसा होईना ॥धृ॥ नाटक झालें जन्माचें, मनीं कां हो येईना ॥१॥. कवी/संगीतकार - गो.ब. देवल, मूळ गायक/नट - केशवराव भोसले; राग - झिंजोटी.
  • पण तुम्ही खा ... ('सामना' चित्रपटातील हिंदूराव पाटील यांच्या तोंडचे एक वाक्य)
  • परवशता पाश दैवें ज्यांच्या गळां लागला ... संगीत रणदुंदुभि'तील नाट्यगीत; कवी - वीर वामनराव जोशी; संगीतकार वझेबुवा; गायक - दीनानाथ मंगेशकर; राग - पिलू.
  • पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ... ग.दि. माडगुळकरकृत 'गीतरामायण' कडवे क्रमांक ... ; संगीत दिग्दर्शक - सुधीर फडके.
  • पळा पळा कोण पुढे पळे तो ... बबन प्रभू यांच्या गाजलेल्या नाटकाचे नाव; नाटकातील प्रमुख भूमिका आत्माराम भेंडे याची.
  • पुच्छ ते मुरडिलें माथां, किरीटेीं कुंडलें बरी ... रामदासस्वामीकृत 'भीमरूपी महारुद्रा' ७.
  • पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद ... व्यंकटेशस्तोत्र १३.
  • बचेंगे तो और भी लडेंगे ... पानिपतच्या युद्धावरील दत्ताजी शिंदे याच्या तोंडचे मरणापूर्वीचे वाक्य
  • बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं ... रामदास स्वामींकृत मनाचे श्लोक, श्लोक ४१वा.
  • बालिश बहु बायकांत बडबडला ... |मोरोपंतांचे आर्याभारत-विराटपर्व-अध्याय ३रा (?), आर्या ??
  • बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले ... संत [[तुकाराम}तुकारामांचा]] अभंग. गाथेतील क्रमांक ?
  • मना सज्जना भक्तिपंथेंचि जावें ... रामदासस्वामीकृत मनाचे श्लोक पहिला.
  • महापुरे झाडें जातीं, तेथें लव्हाळीं वाचतीं ... तुकारामाची गाथा, अभंग क्रमांक ?
  • माझा मराठाचि बोलू, कौतुकें। परि अमृतातेंहि पैजासी जिंके ॥ ... ज्ञानेश्वरी ६/१४.
  • मागें उभा मंगेश, पुढें उभा मंगेश ... 'महानंदा'चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले गीत; कवयित्री - शांता शेळके; संगीतकार - हृदयनाथ मंगेशकर; राग - यमनकल्याण.
  • मी जातां राहिल कार्य काय, जन पळभर म्हणतिल हाय हाय ... कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे यांच्या कवितेतील ओळ.
  • मुका बाळा मी भोळा ... 'वरदक्षिणा' चित्रपटातल्या गीताची ओळ, कवी - ग.दि. माडगुळकर, गायक - सुधीर फडके; संगीतकार - वसंत पवार.
  • य़त्न तो देव जाणावा ...रामदासस्वामीकृत दासबोध?
  • राहिलें रे दूर घर माझें ... भावगीत, कवयित्री - शांता शेळके; गायिका - आशा भोसले; संगीतकार - हृदयनाथ मंगेशकर; राग - धनाश्री + श्री.
  • लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ... तुकारामाची गाथा, अभंग क्रमांक ?
  • लक्ष्मी तुझे पायांतळीं, आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी ... व्यंकटेशस्तोत्र १८.
  • लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ... सुरेश भट
  • विद्यार्थियासी विद्या व्हावी, युद्धीं शस्त्रें न लागावीं ... व्यंकटेशस्तोत्र ८८.
  • समर्थाचिये घरींचें श्वान, त्यासी सर्वही देती मान ... व्यंकटेशस्तोत्र १७.
  • समर्थाचियां सेवकां वक्र पाहें, असा भूमंडळीं कोण आहें ... रामदास स्वामींकृत मनाचे श्लोक, श्लोक ३०वा.
  • सामर्थ्य आहें चळवळीचें, जो जें करील तयाचें, परंतु तेथें भगवंताचें अधिष्ठान पाहिजें ...रामदासस्वामीकृत दासबोध.
  • सुंदरा मनामधि भरली ... शाहीर राम जोशी यांच्या राम जोशी चित्रपटात वापरली गेलेल्या लावणीची पहिली ओळ. गायक/नट - जयराम शिलेदार, संगीतकार - वसंत देसाई, डाॅ, शरद घाटे यांचे याच नावाचे पुस्तक. इंग्रजी-मराठी लेखक दुर्गानंद गायतोंडे यांचा 'सुंदरा मनामध्ये भरली' नावाचा आठ लघुकथा असलेला कथासंग्रह आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मराठी नाटककार, नाट्यनिर्मात्या, नृत्य दिग्दर्शक, आणि अभिनेत्या डाॅ. मीना नेरूरकर यांचा 'सुंदरा मनामधि भरली' नावाचा लावणीनृत्यावर आधारित लोकप्रिय कार्यक्रम होता.
  • सुसंगति सा घडो, सुजन्यवाक्य कानी पडो ... मोरोपंतांची केकावली
  • हरिदासां आवडे कीर्तन ... रामदासस्वामीकृत दासबोध समास नववा-श्रवणनिरूपण, ओवी ४६.


(अपूर्ण)