डी मार्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
D-Mart (fr); ಡಿ - ಮಾರ್ಟ್ (kn); डी-मार्ट (hi); D-MART (te); डी-मार्ट (mr); D-Mart (ga); دی‌مارت (fa); D-Mart (en); டி-மார்ட் (ta) indian hypermarket chain (en); شركة (ar); भारतीय किरकोळ बाजार साखळी (mr); இந்திய ஹைப்பர் மார்க்கெட் (ta) Avenue Supermarts Ltd, DMart (en); डी मार्ट (hi)
डी-मार्ट 
भारतीय किरकोळ बाजार साखळी
नवी मुंबई येथील डी मार्ट
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारव्यवसाय,
सार्वजनिक कंपनी
उद्योगकिरकोळ व्यवसाय
मुख्यालयाचे स्थान
संस्थापक
स्थापना
  • इ.स. २००५
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. तथा डी मार्ट ही २००२ साली राधाकिशन दमानी यांनी स्थापन केलेली भारतातील दुकानांची एक साखळी आहे. जुलै २०१९ च्या सुमारास महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, नवी दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्यांमध्ये १८८ दुकाने होती. या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे.

डी मार्टची जाहिरात एवेन्यू सुपरमार्केट लिमिटेड द्वारे केली जाते. ३१ मार्च २०१९ पर्यंत, डी मार्ट मध्ये एकूण ७,७१३ कायमस्वरूपी कर्मचारी आणि ३३,५९७ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले होते.

प्रारंभिक सार्वजनिक ऑफर सूचीनंतर एवेन्यू सुपरमरकेत लिमिटेड याने नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर बाजारात विक्रमी सुरुवात केली. २२ मार्च २०१७ रोजी स्टॉक बंद झाल्यानंतर, त्याचे बाजार मूल्य ₹३९,९८८ कोटी झाले. यामुळे ती ब्रिटानिया इंडस्ट्रीज, मॅरिको आणि बँक ऑफ बडोदा यांच्या पुढे ६५ वी सर्वात मौल्यवान भारतीय कंपनी आहे.

२१ नोव्हेंबर २०१९ पर्यंत, डी मार्टचे बाजार भांडवल ₹१,१४,००० कोटींच्या जवळपास आहे, ज्यामुळे ती मुंबई रोखे बाजारमध्ये सूचीबद्ध केलेली ३३वी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.