करवाळे
?करवाळे महाराष्ट्र • भारत | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | .६३१५६ चौ. किमी |
जवळचे शहर | सफाळे |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
१,४८९ (२०११) • २,३५८/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०११०२ • +०२५२५ • एमएच४८ |
बोलीभाषा:आदिवासी कातकरी |
करवाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या उत्तर कोकण विभागातल्या पालघर जिल्ह्यात असलेल्या पालघर तालुक्यातले एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गाने गेल्यावर उजवीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव ३.६ किमी अंतरावर आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]हे मध्यम आकाराचे छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३५४ कुटुंबे राहतात. एकूण १४८९ लोकसंख्येपैकी ७५२ पुरुष तर ७३७ महिला आहेत. गावाची साक्षरता ८४.६५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८८.३८ आहे तर स्त्री साक्षरता ८०.८८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २१९ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १४.७१ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात. ते अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालनसुद्धा करतात.
नागरी सुविधा
[संपादन]गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. येथे येण्यासाठी सफाळे रेल्वे स्थानकावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस ठराविक वेळी असतात.रिक्षा दिवसभर मिळतात.हे गाव मुंबई येथील केसी कॉलेजने १५ वर्षांपासून दत्तक घेतले होते आणि येथील आदिवासींचे जीवन पुर्णतः बदलले आहे. गावात ११९ शौचालये बांधली आहेत. गाव हागणदारीमुक्त केलेला आहे. गावातील गावकऱ्यांसाठी नेत्रचिकित्सा कार्यक्रम राबविण्यात आला तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. किचन फार्मिंग, सेंद्रिय भात लागवड, फळझाडे लागवड वगैरे गोष्टी बाबतीत मार्गदर्शन केले. स्त्री सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना लिफाफा बनवणे, पाकिटे तयार करणे, कंदील तसेच दिव्यांची रंगरंगोटी करणे, कागदी पिशव्या तयार करणे असे अनेक उपक्रम राबविले. पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा व्यवसाय करण्यासाठी शिलाई मशीने दिली.
जवळपासची गावे
[संपादन]मथाणे, वेढी, शिलटे, मांजुर्ली, विठ्ठलवाडी, पेणांद, सरतोडी, सरावळी, मांडे, एडवण, डोंगरे ही जवळपासची गावे आहेत.
संदर्भ
[संपादन]https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc ३.महाराष्ट्र टाईम्स.