Jump to content

हर्दखळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हर्दखळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गाव आहे.

  ?हर्दखळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —

गुणक: Coordinates: Unknown argument format

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा रत्नागिरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१६७०१
• +०२३५१
• एमएच०८

भौगोलिक स्थान

[संपादन]

लांजा बस स्थानकापासून मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या उजवीकडील फाट्याने वेरवली कोर्ले मागे भांबेड गावानंतर डावीकडे गेले असता हर्दखळे गाव लागते. लांजा बस स्थानकापासून ते २४ किमी अंतरावर स्थित आहे.

लोकजीवन

[संपादन]

ह्या गावात मुख्यतः मराठा, कुणबी समाजातील लोक पूर्वीपासून स्थायिक आहेत.बरेचसे लोक नोकरी, व्यवसाय,व इतर उद्योग करण्यासाठी मुंबईत कायमस्वरूपी राहत असले तरी शिमगा, गणपती आणि मे महिन्यात आवर्जून गावात येतात. लोक कष्टाळू, प्रेमळ,उत्सवप्रिय, धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने गावात गुण्यागोविंदाने राहत असतात.'अतिथी देवो भव'ची प्रचिती येथे हमखास अनुभवायला मिळते.

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

नागरी सुविधा

[संपादन]

लांजा बस स्थानकातून येथे येण्यासाठी लांजा-हर्दखळे एसटी बससेवा नियमितपणे उपलब्ध आहे.ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक स्वच्छता, रस्ते विकास, रस्तेवीजपुरवठा,आरोग्य तसेच पाणीपुरवठा केला जातो. खाजगी विहिरी, पर्हे,ओहोळ ह्यांंचासुद्धा बारमाही पाण्यासाठी वापर केला जातो.

जवळपासची गावे

[संपादन]

पालू, बाणखोर, खोरनिनको, प्रभानवल्ली, भांबेड, कुडेवाडी, वाघणगाव, विलवडे, मोगरगाव, व्हेळ, शिरवली ही जवळपासची गावे आहेत.हर्दखळे ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[]

  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/lanja.html