मुकुंद टाकसाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मुकुंद टाकसाळे (जन्म : ४ ऑक्टोबर १९५१) हे विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. टप्पू सुलतान या टोपणनावानेही त्यांनी काही लिखाण केले आहे.

टाकसाळे यांनी साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींवर ललित मासिकात आनंद पुणेकर या टोपणनावाने एक सदर चालविले होते. "ठणठणपाळा'हून वेगळी शैली असलेल्या या सदराला वाचकांनी पसंत केले होते.

पुस्तके[संपादन]

  • आणखी गमतीगमतीत
  • आनंदीआनंद
  • उंदरावलोकन
  • गमतीगमतीत
  • टप्पू सुलतानी
  • टाकसाळी कथा - निवडक मुकुंद टाकसाळे
  • टांकसाळेतील नाणी
  • तिरपागड्या कथा
  • तेंडुलकर : असेही तसेही
  • नाही मनोहर तरी
  • पु. ल. नावाचे गारूड (संपादित)
  • मिस्किलार
  • मुका म्हणे
  • राधेने ओढला पाय ...
  • सक्काळी सक्काळी
  • स(द)रमिसळ
  • साडेसत्रावा महापुरुष
  • हसंबद्ध
  • हास्यमुद्रा

पुरस्कार[संपादन]