चेन्नई एक्सप्रेस
Appearance
चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला असून हा भारतीय चित्रपट असून चित्रपटाची कथा ही प्रेम कॉमेडी आणि हाणामारीवर आधारित आहे. चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी आहे आणि हा चित्रपट गौरी खान प्रदर्शित आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करणारे शाहरुख खान आणि दीपिका पडुकोण हे कलाकार आहेत.
शाहरुख खान आणि दीपिका पडुकोण या कलाकारांनी ओम शांती ओम (२००७) या चित्रपटातही आधी सोबत काम केले आहे. चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट जगामध्ये ८ ऑगस्टला प्रदर्शित केला होता व भारतात ९ ऑगस्टला प्रदर्शित केला होता. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटाने भारतात आणि जगात कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले होते. या चित्रपटाने भारतात व जगभरात १ अरब रुपयांची कमाई केली आहे.