चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जुन्या चर्चा दुवा
#१ जुनी चर्चा १
#२ जुनी चर्चा २

लेखांचे स्वतंत्र स्वरुप[संपादन]

अजिंठा-वेरूळची लेणी या लेखात वेरूळ लेण्यांचा सविस्तर विचार आहे. त्यामुळे हा लेख रद्द करून त्या मोठ्या लेखात वर्ग करावा असे वाटते.आर्या जोशी (चर्चा)

अजिंठा (लेणी) आणि वेरूळ (लेणी) या लेण्या स्वतंत्र असल्यामुळे दोन्ही लेख स्वतंत्र असणार आहेत. आणि तेच मुक्य लेख असणार आहेत.
अजिंठा-वेरुळची लेणी हा लेख मुखपृष्ठ सदर राहुन गेल्यामुळे रेकॉर्डपरपज करता ठेवला आहे, भविष्यात किंवा कन्फ्युजन खुप वाढल्यास विकिपीडिया नामविश्वात नेऊन जतन करता येईल सामायिक लेखाचे सध्या अभिप्रेत स्वरुप अजिंठा (लेणी) आणि वेरूळ (लेणी) या लेखांवर बेतलेला असेल असे आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:४८, ५ मे २०१७ (IST)[reply]

नमस्कार! आपण सर्वजण एक ज्ञानकोश समृृद्ध करत अहोत. त्यामुळे वैयक्तिक मतमतांंतरात नअडकता आपण आपले काम करत राहणे मला योग्य वाटते. सदर लेख मुखपृृष्ठावर येऊन गेला आहे असे सअजते.त्याचे निकष नेमके काय लावले गेले? हेजाणण्याची उत्सुकता आहे. शिल्पशास्राख्या सुंंदर विषयावर असा लेख करताना अधिक वाव होता असे दिसते. माझा अभ्यासविषय असल्याने मी कालांंतराने हा लेख सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की करेन पण उत्सुकता म्क्षणून हे विचारांंसंं वाटलंं. कुणाचाही अनमान करण्याचा हेतू नाही.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) ___________________

सर्वात महत्त्वाचे[संपादन]

वेरूळमधला रू कधीही ऱ्हस्व नसतो, प्रत्ययांपूर्वी किंवा आधी. तो जिथे जिथे ऱ्हस्व काढला असेल तेथे तेथे तो दीर्घ करावा, आणि मग हवी ती चर्चा करावी.

आणखी, लेणी हे अनेकवचन आहे, लेणे हे एकवचन. लेण्या असा शब्द मराठीत नाही!... (चर्चा) १६:४७, ११ मार्च २०१८ (IST)[reply]

वेरूळवेरूळ लेणी या दोनही लेखशीर्षकात रू (दीर्घ) आहे. लेखात ऱ्हस्व असल्यास तो हटवायला हवा.--संदेश हिवाळेचर्चा १७:४३, ११ मार्च २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: नमस्कार! या लेखात वेरूळमधील तीन चार लेण्यांचे सविस्तर वर्णन आहे.ही माहिती वेरूळ लेणी या स्वतंत्र लेखात घालावी असे वाटते.अजिंठा लेणी या लेखात मी तसा प्रयत्न केला आहे.भारतीयविद्या किंवा इंडोलाॅजी हा माझा अभ्यासविषय असल्याने मला या चारही लेखात बदल करावे असे वाटते आहे.मात्र पूर्वीच्या चर्चांचा आढावा घेता आपले मार्गदर्शन घेऊन मग पुढे या चार लेखांवर काम करावे असे वाटले.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) ०८:४७, २४ मार्च २०१८ (IST)[reply]

@आर्या जोशी:,
स्वतंत्र लेख करण्यासाठी दोन मुख्य निकष लावावे -
१. विषयवस्तूची पुनरावृत्ती होता कामा नये.
२. वेगळा लेख करण्यासाठी पुरेसा मजकूर आणि मुद्दे असावेत. असा मजकूर टाकोटाक लिहिलाच पाहिजे असे नाही परंतु लिहिण्यास वाव जरुर असला पाहिजे.

अनेकदा (१) मुळे एकत्रित असलेले लेख पुढे जाता वेगळे करता येतात - उदा. मुंबईमधील ऐतिहासिक इमारती हा लेख पुढे जाता मुंबईमधील ऐतिहासिक इमारती, मुंबईमधील अठराव्या शतकापूर्वीच्या ऐतिहासिक इमारती आणि मुंबईमधील अठराव्या शतकोत्तर ऐतिहासिक इमारती असे वेगळे करण्यास हरकत नाही. यात अठराव्या शतकाअखेर मुंबईतील इमारतींच्या स्थापत्यकलेत मोठे बदल झालेले असल्याने असे वेगळे लेख करण्यास वाव आहे.

तुम्ही प्रस्तुत विषयात विद्वान असल्याने तुमचे लिखाण वाचण्याची उत्सुकता आहे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०९:४५, २४ मार्च २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: धन्यवाद!या निमित्ताने अभ्यासाची उजळणी होते आणि नवी माहिती मिळते हे संपादक म्हणून अनुभवाला येते.त्यामुळे लेख चांगले आणि मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करण्याचा प्रयत्न करते.आर्या जोशी (चर्चा) ०९:५९, २४ मार्च २०१८ (IST)[reply]

जुनी चर्चा[संपादन]

जुन्या चर्चा विदागारात टाकण्याशी दुमत नाही.

आणि

सध्या य़ा दोन जुन्या चर्चा विदागारात दिसत आहेत. परंतु या पानाच्या सुरुवातीला या दोन्हींपैकी एका चर्चेचा विदागारातील दुवा असायला हवा किंवा दाखवा/लपवा स्वरुपात ती चर्चा येथे ठेवावी. -- संतोष दहिवळ (चर्चा) १०:२०, २४ मार्च २०१८ (IST)[reply]

केले -- १०:३१, २४ मार्च २०१८ (IST)