बुंदेलखंड एक्सप्रेस
Appearance
१११०७/१११०८ बुंदेलखंड एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वेसेवा आहे. उत्तर मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी ग्वाल्हेरच्या ग्वाल्हेर रेल्वे स्थानक ते वाराणसीच्या वाराणसी रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश राज्यांतून धावणारी बुंदेलखंड एक्सप्रेस ग्वाल्हेर व वाराणसी दरम्यानचे ३८८ किमी अंतर ९ तास व ४५ मिनिटांत पूर्ण करते.
ही गाडी प्रामुख्याने बुंदेलखंड प्रदेशातून धावत असल्याने तिला बुंदेलखंड एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे.
प्रमुख थांबे
[संपादन]- ग्वाल्हेर रेल्वे स्थानक
- झाशी रेल्वे स्थानक
- महोबा
- बांदा
- चित्रकूटधाम
- अलाहाबाद रेल्वे स्थानक
- वाराणसी रेल्वे स्थानक