Jump to content

विकिपीडिया:धूळपाटी/दाक्षिणात्य शब्द देवनागरीत लिहिताना नेहमी होणाऱ्या चुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हे पान अनाथ आहे.
जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.


दाक्षिणात्य शब्द देवनागरीत लिहिताना नेहमी होणाऱ्या चुका
(Common Mistakes while writing South Indian words in Devnagari Script)

हा लेख कुणासाठी ?

[संपादन]

१) जे लेखक किंवा वाचक द्राविडीभाषांशी अपरिचित आहेत किंवा ज्यांना त्यांविषयी पुरेशी माहिती नाही असे सर्वजण.
२) ज्यांना द्राविडी लिप्या वाचता येत नाहीत किंवा समजत नाहीत ते सर्वजण.
३) ज्यांना रोमन लिपीतील दाक्षिणात्यभाषिक मजकूर समरूप देवनागरीत लिहावयाचा आहेत असे सर्वजण.
४) हा लेख द्राविडी भाषा शिकण्यासाठी किंवा त्यां भाषांतील मजकुरांचे मराठीत भाषांतर करणे ह्यावर विशेष मार्गदर्शन करीत नाही.
५) लेखाचा मूळ उद्देशच "अपरिचित/अनोळखी दाक्षिणात्य शब्द देवनागरीत लिहितांना नेहमी होणाऱ्या चुका" असा आहे त्यामुळे तो साधारणपणे द्राविडी अक्षरांशी ओळख झाल्यावर त्यांच्या भाषेतील शब्दांचे लिखाण देवनागरी मराठीत कसे करावे ह्याचेच केवळ मार्गदर्शन करतो.
६) ज्यांना तमिळ किंवा तत्सम भाषेची तोंडओळख करून हवी असेल त्यांच्यासाठी हा लेख उपयोगी ठरू शकतो.
७) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इथे देवनागरी म्हणजे मराठी देवनागरी ह्या अर्थाने लिहिले आहे.हिंदी, संस्कृत, कोकणी, भिल्ली, भोजपुरी, कुरुख, सिंधी किंवा नेपाळी भाषांतील समानार्थी, समानोच्चारी व सारखेच भासणारे शब्द भिन्न असू शकतात.
८) इतर सर्व देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या भाषांमध्ये इथे दिलेल्या द्राविडी शब्दांची समरूपे मांडण्याची पद्धत सारखी असेलच असे नाही.

लेखाची पार्श्वभूमी

[संपादन]

मराठी विकिपीडियावर लिखाण करीत असतांना अनेकदा आपल्याला इतर भाषांतील विकिपीडियांच्या माहितीचा संदर्भ घ्यावा लागतो. विशेषेकरून, रोमन लिपीत लिहिलेले दाक्षिणात्य भाषेतील शब्द जेव्हा आपल्या वाचनात येतात, तेव्हा, जर त्या शब्दांच्या मांडणी विषयी थोडी माहिती असेल तरच ते उतरवून घेणे माणसाला शक्य असते. दाक्षिणात्य शब्द देवनागरीत लिहितांना मुळात दोन अडचणी येतात. एक म्हणजे, त्यांच्या शब्दाशी लेखकाची ओळख नसल्याने तो शब्द कसा लिहिला आहे हे त्याला नेमके माहीत नसते. त्यामुळे तो त्याच्या भाषेनुसार त्यात बदल करून तो त्याला परिचित असलेल्या शब्दाप्रमाणे लिहितो. दक्षिणेकडे त्यांच्या लिपीतील शब्द रोमन समरूपात लिहिण्याची पद्धत ही मराठी पद्धतीपेक्षा थोडीफार वेगळी असू शकते. ह्या दोन आणि अश्या सर्वच गोष्टी विचारात घेऊन, सर्व हौशी मराठी वाचकांसाठी व लेखकांसाठी उपयोगी ठरू शकेल असा ह्या विषयावर हा लेख लिहिण्यात आला आहे. हा वाचून त्या भाषांशी मराठी भाषकाची जवळीक साधण्यास मदतही होईल व द्राविडी शब्दांच्या लेखनात होणाऱ्या चुकाही कमी होतील. ज्यांना दक्षिणेतील लेख किंवा माहिती इंग्रजी माध्यमाद्वारे घेऊन ती मराठी देवनागरीत आणावयाची आहे त्यांच्यासाठी हा लेख मार्गदर्शक ठरावा.

द्रविड कुलोत्पन्न भाषांचा इतिहास व मराठीशी त्यांचा घनिष्ठ संबंध

[संपादन]

महाराष्ट्र ,महाराष्ट्राची संस्कृती आणि भाषा ह्यांचा दक्षिणेशी पूर्वापार संबंध आहे. इतिहासात महाराष्ट्राची ओळख दक्षिणेचे राज्य अशीच होती. ज्यास "डेक्कन" म्हणतात ते दक्षिण ह्या संस्कृत शब्दाचे अपभ्रंश रूप आहे.वास्तविक जिच्या पासून इतर सर्व द्रविड भाषांची निर्मिती होत गेली त्या दक्षिणेतील द्रविडी भाषा(सध्याची तमिळ) अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्रात रोजच्या व्यवहारात उपयोगात आणली जात होती. तिला दक्षिणगंगा म्हणतात, त्या गोदावरी नदीच्या दक्षिणेच्या सर्व त्रिभुज प्रदेशांत, म्हणजेच सध्याचे नाशिक व त्याच्या दक्षिणेकडील महाराष्ट्रात आणि जवळपासच्या इतर भागांत ही भाषा प्रचलित होती, असा उल्लेख इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकाच्या इतिहासात आढळतो. भाषेच्या काही जाणकारांच्या मते, काळाच्या ओघात हळू हळू बदल होत होत त्या भाषेपासून व त्या काळात प्रचलित असणाऱ्या संस्कृतपासून अपभ्रंश होऊन आजची मराठी भाषा तयार झाली. ज्या काळापर्यंत मराठी भाषेवर दक्षिणेकडील भाषाभगिनी सोडता इतर भाषांचा परिणाम जाणवत नव्हता, त्या काळातल्या ज्ञानेश्वर महाराज आणि तत्कालीन इतर संतांनी जिची गोडवी गायली, ती मराठीदेखील आज नीटशी समजत नाही. मध्यंतरीच्या काळात मराठी भाषेत खूप बदल झाले. विशेषकरून जेव्हा तिचा संपर्क गेल्या काही शतकात उत्तरेतील हिंदीच्या/उर्दूच्या ह्या भाषांशी अधिक प्रमाणात होऊ लागला तसेच त्या भाषांच्या अधिक परिचयामुळे व दैनंदिन वापरामुळे (उदा.माहितीप्रसारण, मनोरंजन, कला, व्यवसाय इ.ठिकाणी) देखील अनेक हिंदी शब्द जसेच्या तसे घेऊन बऱ्याचदा ते मराठी म्हणूनच वापरात घेण्यात येऊ लागले व त्यांची रोमन समरूपे देखील त्याचप्रकारे मांडण्याचा प्रकार अस्तित्वात आला. त्यामुळेच आजची मराठी ही हिंदीसदृश किंवा उर्दूसदृश्य भासते, ह्याविषयी देखील ह्याच लेखात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मराठी माणसास परिचित आणि सध्या अपरिचित झालेले असे अनेक शब्द आहेत, जे दक्षिणेत आजही व्यवहारात आहेत, फक्त त्यांची लिहिण्याची पद्धत वेगळी भासत असल्याकारणाने ते भिन्न वाटतात. या लेखात त्याविषयीचे थोडे मार्गदर्शन आहे.


संदर्भ:http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language Marathi is actually a language combining the old Dravidian vernacular of the region which would have been close to Kannada and Telugu and the actual Maharashtri Prakrit and Sanskrit.The more recent influence of Persian, Arabic or Urdu has also made this language seem close to mainstream Hindi


द्राविडी भाषांची तोंडओळख

[संपादन]