दरभंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दरभंगाचे नकाशावरील स्थान

दरभंगा
भारतामधील शहर


दरभंगा is located in बिहार
दरभंगा
दरभंगा
दरभंगाचे बिहारमधील स्थान

गुणक: 26°9′25″N 85°53′58″E / 26.15694°N 85.89944°E / 26.15694; 85.89944

देश भारत ध्वज भारत
राज्य बिहार
जिल्हा दरभंगा
क्षेत्रफळ १९ चौ. किमी (७.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १७१ फूट (५२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३,८०,१२५
अधिकृत भाषा मैथिली
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)


दरभंगा हे भारताच्या बिहार राज्याच्या दरभंगा ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय व उत्तर बिहारमधील एक प्रमुख शहर आहे. जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाणारे दरभंगा ऐतिहासिक मिथिला राज्याचे राजधानीचे शहर होते. आजच्या घडीला दरभंगाला बिहारचे सांस्कृतिक केंद्र मानण्यात येते. २०११ साली दरभंगाची लोकसंख्या सुमारे ३.८ लाख होती.

दरभंगा उत्तर बिहारमधील सर्वात मोठे वाहतूककेंद्र आहे. भारतीय रेल्वेच्या पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीखालील दरभंगा जंक्शन रेल्वे स्थानक येथील मुख्य रेल्वे स्थानक असून येथून दिल्ली, कोलकाता, पाटणा तसेच इतर अनेक प्रमुख शहरांसाठी रेल्वेगाड्या सुटतात. दरभंगा विमानतळ २०२० साली खुला करण्यात आला व आजच्या घडीला इंडिगोस्पाईसजेट मार्फत येथून हैद्राबाद, मुंबई, बंगळूर, कोलकाता इत्यादी शहरांना जोडणारी थेट विमानसेवा चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग २७ हा भारतामधील एक प्रमुख महामार्ग दरभंगामधून धावतो.